पुणे शहर

जास्त फ्लॅट असणाऱ्या सोसायट्यांमध्ये लसीकरणाची व्यवस्था करावी ; भाजप सहकार आघाडीची मागणी..

पुणे : महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी नुकतेच महापौर व भाजपा शिष्टमंडळा सोबत झालेल्या बैठकीत जर एखाद्या कंपनीने आपणास लसीकरणासाठी लागणाऱ्या मुलभूत सुविधा पुरविल्यास संबंधित जागेवर जाऊन आपण लसीकरण करून देत आहोत असे सांगितले होते .याच धर्तीवर २०० प्लॅटचे पुढील सोसायटीने जर आपल्याला मुलभूत सुविधा आणि जागा उपलब्ध करून सर्व नियम अटींचे पालन केल्यास त्याठिकाणी लसीकरणाची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी भाजप सहकार आघाडीचे शहराध्यक्ष सचिन दांगट यांनी केली आहे. Vaccination should be arranged in societies with lots of flats; Demand for BJP cooperative Front

या संदर्भातील निवेदन दांगट यांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडे दिले आहे. यावेळी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने , सभागृह नेते गणेश बिडकर ,सहकार आघाडी सरचिटणीस अजित देशपांडे , उपाध्यक्ष अक्षयसिंह शितोळे आदि पदाधिकारी उपस्थित होते .
   
पुणे शहरात नोंदणीकृत असणारे गृहरचना सोसायट्यांची संख्या जवळपास १८००० इतकी असुन यापैकी किमान २०० फ्लॅट असणाऱ्या गृहरचना संस्थामध्ये लसीकरणाची सोय करून दिल्याने नागरिक इतरत्र न फिरता आपल्या सोसायटीतच लसीकरण करून घेतील व मोठ्या संख्येने लसीकरण एकाच ठिकाणी होऊन कोरोनाचा संसर्ग ही रोखता येईल असे सचिन दांगट यांनी म्हंटले आहे.

IMG 20210430 WA0001

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १८ ते ४४ या वयोगटातील प्रत्येक भारतीयास कोरोना प्रतिबंधक लस देण्याचे जाहीर केले आहे.  त्यामुळे नागरिक लवकर लसीकरण करून घेण्यास उत्सुक आहेत त्यामुळे मोठ्या सोसायट्यांमध्ये लसीकरणाची सोय केल्यास त्याचा फायदा होणार असून यंत्रणेवरचा ताण कमी होण्यास मदत मिळणार असल्याचे दांगट यांनी सांगितले. 

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये