मालवणमधील राजकोट दुर्घटनेच्या निषेधार्थ पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून मूक आंदोलन

छत्रपती शिवाजी राजे देशाची अस्मिता आणि ही अस्मिता जपण्याचे सर्वांनी करावे : दीपक मानकर
पुणे : मालवणमधील राजकोट किल्यावर उभारण्यात आलेल्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा केवळ आठ महिन्यामध्येच अचानक दुर्घटनाग्रस्त झाला आहे. या दुर्घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी तसेच भविष्यामध्ये अश्या दुर्घटना पुन्हा घडू नयेत याची खबरदारी घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर तर्फे SSPMS(एस.एस.पी.एम.एस.)कॉलेज, शिवाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या समोर मूक आंदोलन पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
या प्रसंगी दीपक मानकर म्हणाले, छत्रपती शिवाजी राजे या देशाची अस्मिता आहे आणि अस्मिता जपण्याचे काम प्रत्येक शिवप्रेमीने आपल्या जीवनात केले पाहिजे. सत्ता असो नसो राजेंच्या स्मृती आपण सर्वांनी जपायचा प्रयत्न केला पाहिजे. हा पुतळा उभारताना अनेक अक्षम्य त्रुटी झाल्याचे नाकारता येत नाही. या पुतळ्याच्या उभारणीमध्ये आर्किटेक असतील, शिल्पकार असतील जे दोषी असतील त्यांच्यावर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली पाहिजे.
पुढे मानकर म्हणाले, नैसर्गिक वातावरणाची माहिती घेऊन व त्यावर अभ्यास करून या पुतळ्याची उभारणी केली पाहिजे होती. ८ महिन्यात हा पुतळा पडत असेल तर याला सरकारी यंत्रणा जबाबदार आहे. यात राजकीय भांडवल न करता सर्वांनी एकत्र येऊन परत कसा चांगला मोठा पुतळा उभारता येईल याचा विचार केला पाहिजे.

या मूक आंदोलनात शहराध्यक्ष दीपक मानकर, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, विरोधी पक्षनेते दत्ता सागरे, माजी नगरसेवक प्रमोद निम्हण, रोहिणी चिमटे, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष शंतनू कुकडे, प्रदेश पश्चिम युवक अध्यक्ष महेश हांडे, अल्पसंख्याक अध्यक्ष समीर शेख, युवती अध्यक्ष पूजा झोळे, विद्यार्थी शुभम माताळे, वकील सेल अध्यक्ष विवेक भरगुडे, माहिती अधिकार अध्यक्ष दिनेश खराडे, दिव्यांग सेल अध्यक्ष पंकज साठे, महिला कार्याध्यक्ष गौरी जाधव, कोथरूड अध्यक्ष हर्षवर्धन मानकर, हडपसर अध्यक्ष शंतनू जगदाळे, निरीक्षक मुनीर सय्यद, खडकवासला ग्रामीण अध्यक्ष राजेंद्र पवार, योगेश वराडे, शिवाजीराव पाडळे, तेजल दुधाणे,
नीता गायकवाड, सुप्रिया कांबळे, धनंजय पायगुडे, शीतल जौंजाळ,राहुल तांबे, गोरखनाथ भिकुले, बाळासाहेब आहेर, गिरीश मानकर,संतोष बेंद्रे, चित्रलेखा दाभेकर,गजानन लोंढे, योगेश शेलार, विपुल म्हैसूरकर, पंडित जगताप,विजय जाधव, सुनिता चव्हाण,विक्रम मोरे,शालिनी जगताप, वंदना साळवी,उषा नेटके, लोपा भगत,लावण्या शिंदे, शीतल मेदने,विनोद सकट, शैलेश मानकर, अशोक जाधव,कार्तिक थोटे, माधवी मोरे, नवनाथ खिलारे,सुनिता बडेकर, राधिका वाईकर, शाम शेळके, श्वेता मिस्त्री, श्रीधर स्वामी शहरातील पदाधिकारी व शिवप्रेमी उपस्थित होते.









