कोथरूड मधील गुजरात कॉलनीत बाल प्रतिष्ठान ची दहीहंडी उत्साहात ; महिला अत्याचाराचा केला निषेध
कोथरुड : गुजरात कॉलनी मधील वर्धमान प्रेस चौक येथील बाल प्रतिष्ठान च्या वतीने मोठ्या उत्साहात दहीहंडी साजरी करण्यात आली. दहीहंडीला सुरुवात करण्यापूर्वी बदलापूर, कोल्हापूर तसेच महाराष्ट्रातील विविध ठिकाणी महिला व मुलींवर झालेला अन्याय अत्याचार याबद्दल तीव्र निषेध व्यक्त करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी नगरसेवक पृथ्वीराज सुतार, विपुल होवाळ, प्रीतम मेहता, राकेश सोनेकर, प्रणय मेहता, अमर मांढरे, व्यंकटेश गुंडाळे, अनिल मांढरे, सुचेन्द्र यादव तसेच परिसरातील अनेक मान्यवर नागरिक उपस्थित होते.
गोविंदा आला रे आला…. गोविंदा रे गोपाळा……या पारंपरिक गाण्यांवर तसेच गोविंदा रे गोपाळा….यशोदेच्या ताना बाळा….. चांदी की डाल पर…. सोने का मोर…. अशा हिंदी मराठी रिमिक्स गाण्यावर पावसाच्या सरीवर सरी झेलत चिमुकल्यांचे व तरुणाईचे पाय थिरकले आणि मोठ्या उत्साहात रात्री 9 वाजून 55 मिनिटांनी दहीहंडी फोडण्याचा आली.
दहीहंडी चे संयोजन बाल प्रतिष्ठानचे अध्यक्ष हर्ष मेहता, उपाध्यक्ष आयुष मांढरे, अर्णव शेलार मोरया सोनेकर, ओम मांढरे, प्रथमेश पेठे, नील मेहता, युवराज खत्री आदी कार्यकर्त्यांनी केले होते.