उर्मिला कोठारेचं तब्बल 12 वर्षांनंतर छोट्या पडद्यावर कमबॅक

मुंबई : अभिनेत्री उर्मिला कोठारे तब्बल बारा वर्षानंतर छोट्या पडद्यावर कमबॅक करणार आहे. गाण्यांच स्वप्न उराशी बाळगलेल्या आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थिती ते पूर्ण करण्यासाठी झटणाऱ्या चिमुकल्या स्वराची गोष्ट या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येईल. स्टार प्रवाह वाहिनीवरील सर्वच मालिका सुरू होणार आहे.
स्टार प्रवाहच्या या परिवारात लवकरच आणखी एका नव्या मालिकेचं कुटुंब सामील होणार आहे. या नव्या मालिकेचं नाव आहे ‘तुझेच मी गीत गात आहे’ गाण्याचं स्वप्न उराशी बाळगलेल्या आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ते पूर्ण करण्यासाठी झटणाऱ्या चिमुकल्या स्वराची गोष्ट या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येईल. सुप्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला कोठारे तब्बल १२ वर्षांनंतर या मालिकेतून छोट्या पडद्यावर कमबॅक करणार आहे. वैदेही असं तिच्या पात्राचं नाव असून ती स्वराच्या आईची भूमिका साकारणार आहे.
कुल्फी कुमार बाजेवाला’ या हिंदी मालिकेचं हे मराठी व्हर्जन असल्याचं म्हटलं जात आहे. मालिकेचा प्रोमो उर्मिलाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या भूमिकेविषयी चाहत्यांनी उत्सुकता व्यक्त केली आहे. ही नवी मालिका येत्या 2 मे पासून रात्री 9 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.




