पुणे शहर

सिंहासन news च्या बातमीनंतर पालिकेला आली जाग ; कर्वेनगरमध्ये महापालिका ॲक्शन मोडवर..

पुणे : कर्वेनगरच्या मुख्य चौकात असणाऱ्या उड्डाणपुलाजवळ  रस्त्याच्या कडेने मोठ्या प्रमाणावर राडारोडा टाकला जात आहे. या राडारोड्यामुळे कर्वेनगरच्या मुख्य रस्त्याच्या कडेने बकालपणा निर्माण होत असून याला जबाबदार कोण ? अशी बातमी सिंहासन news ने प्रसिद्ध केल्यानंतर महापालिका प्रशासनाला जाग आली असून आज पदपथावर व रस्त्या लगत पडलेला राडारोडा हटवण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

Img 20220122 wa0254

कर्वेनगर उड्डाणपुलाच्या कडेने रस्त्या लगत व पदपथावर मोठ्या प्रमाणावर बांधकामाचा राडारोडा आणून टाकण्यात येत होता मात्र प्रशासनाकडून व स्थानिक लोप्रतिनिधींकडून या प्रश्नाकडे लक्ष देण्यात येत नसल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत होती.

सिंहासन news ने हा  विषय प्रसिद्ध केल्यानंतर प्रशासनाकडून तातडीने हालचाली सुरू करण्यात आल्या. आज सकाळीच महापालिकेच्या वतीने येथील रस्त्याच्या कडेचा व पदपथावरील राडारोडा काढायला सुरुवात करण्यात आल्यानंतर नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

सिंहासन News कर्वेनगरमध्ये राड्यारोड्यामुळे निर्माण होणाऱ्या बकालपणाला जबाबदार कोण ? https://www.sinhasannews.com/who-is-responsible-for-karvenagars-durty-8333/

Img 20220118 wa0213
Img 20211231 wa00066164473394770712000

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये