KGF 2 ची पहिल्याच दिवशी बंपर कमाई ; यशने स्वतःच्याच चित्रपटाचा मोडला विक्रम

कन्नड सुपरस्टार यशच्या ‘केजीएफ २’या चित्रपटाने प्रदर्शनाच्या दिवशी धमाका केला आहे. प्रशांत अनिल दिग्दर्शित या चित्रपटाने पहिल्याच दिवशी अनेक चित्रपटांचे विक्रम मोडले आहेत. हा चित्रपट प्रदर्शित करण्यापासून थांबवला गेला होता, परंतु आता लॉकडाऊनचे सगळे निर्बंध हटवण्यात आले आहेत आणि लगेचच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस प्रदर्शित करण्यात आला आहे.
केजीएफ हिंदी वर्जनने बंपर कमाई करत अनेक मोठ्या हिंदी चित्रपटांना मागे पाडले आहे. या चित्रपटाची पहिल्याच दिवशी ५३.९५ कोटी रुपयांची कमाई केली आहे तर भारतात १३४.५कोटी रुपयांची कमाई केली आहे. वॉर, ठग्ज ऑफ हिंदुस्तान या चित्रपटांना केजीएफ२ ने मागे टाकले आहे. नंया चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. केजीएफ चाप्टर वन या चित्रपटाचा हिंदी वर्जनचा लाईफटाईम बिझनेस ४४.०९ कोटी रुपये इतका झाला आहे. हा आकडा यशच्या ‘केजीएफ२’ चाप्टर वन ने पहिल्याच दिवशी पार केला आहे.
कमाईचा हा आकडा पाहता येत्या काही दिवसात हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर इतरही चित्रपटांचे विक्रम मोडणार असल्याचे दिसत आहे. ॲडव्हान्स बुकिंगच्या बाबतीतही त्या चित्रपटाने एस एस राजामौली यांच्या RRR या चित्रपटाचाही विक्रम मोडला आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाला अवघे चार दिवस राहिले असताना केजीएफटू च्या हिंदी वर्जनची जवळपास अकरा कोटी रुपयांची तिकिटे विकली गेली होती. या तुलनेत RRR च्या हिंदी वर्जनचे फक्त पाच कोटी रुपयांचा ॲडव्हान्स बुकिंग झाले होते.







