पुणे शहर

सावली संस्थेतील मुलांबरोबर माणुसकीची दिवाळी ; विशेष मुलांची धम्माल मस्ती, नाच, गाणी : पहा व्हिडिओ

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचा उपक्रम

पुणे : खरा आनंद, खर सुखं काय असते याचा अनुभव आज अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पुणे पदाधिकाऱ्यांनी अनुभवला. निम्मित होते, सावली या संस्थेतील दिव्यांग मुलांसोबत साजरी झालेल्या माणुसकीची दिवाळी उपक्रमाचे. या संस्थेतील मुलांबरोबर केलेली दिवाळी म्हणजे खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी झाल्याच्या भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या.

https://youtu.be/PiiHgFITJCc

यावेळी सावली संस्थेतील विशेष मुलांनी दिवाळीनिमित्त विविध कला सादर करुन उपस्थित प्रेक्षकांचे मनोरंजन केले, धमाल मस्ती, नाच, गाणी यांनी त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता, आणी प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी, एक वेगळा अनुभव, आयुष्याचा सच्चेपणा यावेळी जाणवला. गर्वाच्या शिखरावर तरंगणाऱ्या या सामान्य माणसाच्या अहंकाराला काही क्षणात जमिनीवर आणले.

पदाधिकाऱ्यांच्या डोळ्यातील भाव आजच्या वेगळ्या उपक्रमाचे यश सांगत होते. नियोजनबद्ध साकारलेल्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महासंघाचे तसेच इतर ब्राह्मण संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. महासंघातर्फे सर्व उपस्थितांना व मुलांना दिवाळी फराळ वाटण्यात आला.

Screenshot 2021 10 26 15 21 45 02

महासंघाच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षा केतकी कुलकर्णी, शिल्पा महाजनी, शैला सोमण, सीमा रानडे, चित्रा जोशी, राष्ट्रीय पदाधिकारी अमोघ टेंबेकर,कोषाध्यक्ष कमलेश जोशी, विवेक खीरवडकर, रवींद्र रानडे, डॉ अरुण जोशी, विकास अभ्यंकर, दीपक महाजनी, मनीष जोशी, प्रदीप रत्नपारखे, दयाकर दाबके उपस्थित होते.

सावली तर्फे विनिता कामत , अलका पारखी, मयुरी कुलकर्णी उपस्थित  व सर्व सावली परिवाराचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा कार्याध्यक्ष मंदार रेडे यांनी केले होते. सुप्रियाताई बडवे (बडवे इंडस्ट्री), वसंत ठकार यांचे विशेष मार्गदर्शन लाभले, कॅनडाहून किरण चिखले यांचे प्रायोजकत्व लाभले.

Img 20211104 wa0543
Fb img 1636016398948
Img 20211102 wa0316
Img 20211028 wa0117
Img 20211101 wa0234
Img 20211104 wa0011
Fb img 1636016631083
Img 20211102 wa0053
Img 20211104 wa0232
Img 20211102 wa0361
Img 20211101 wa0255
Fb img 1636020717606
Img 20211103 wa0158
Img 20211102 wa0370
Img 20211104 wa0275
Fb img 1636016574694
Img 20211029 wa0063
Img 20211027 wa0188
Img 20201113 wa0322
Screenshot 2020 11 15 08 47 31 83
Img 20211104 wa0560
Img 20211102 wa0037
Img 20211102 wa0015

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये