पुणे शहर
माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांचे बंधू श्रीकांत मोकाटे यांचे अपघाती निधन

पुणे : कोथरुडचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांचे बंधू श्रीकांत बलभीम मोकाटे यांचे आज सकाळी येथे अपघाती निधन झाले आहे.
आज सकाळी खेड शिवापूर जवळ एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. त्यांच्या निधनाने कोथरूड मध्ये शोककळा पसरली आहे.
श्रीकांत मोकाटे हे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांचे ज्येष्ठ बंधू व माजी नगरसेवक ॲड .योगेश मोकाटे, उद्योजक निलेश मोकाटे यांचे वडील होत.



