पुणे शहर

पुणे शहरातील “या” भागातील पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार…

पुणे : पुणे शहरातील या भागातील पाणी पुरवठा गुरुवारी बंद राहणार आहे. तसेच शुक्रवारी सकाळी उशीरा कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती पुणे महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

गुरुवार दिनांक १२/०२/२०२६ रोजी वडगाव जलशुद्धीकरण केंद्र टप्पा-१ चे रॉ वॉटर पाईप लाईनवर डमी प्लेट (बंद प्लेट) मागणेकरिता व वडगाव जलशुद्धीकरण केंद्र येथे तीन नवीन किओस्क बसविणेचे कामासाठी वडगाव जलकेंद्र अखत्यारीतील सकाळी १० ते रात्री १२ पर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे.तसेच शुक्रवार दिनांक १३/०२/२०२६ रोजी सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

पाणीपुरवठा बंद असणारा भाग :-

Img 20251125 wa01788344877527023851533

वडगाव जलकेंद्र परीसर :- हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज,भारती विद्यापीठ परीसर, कोंढवा बुद्रुक आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, येवलेवाडी, सहकारनगर भाग २ वरील भाग,आंबेडकरनगर, टिळकनगर परिसर, दाते बस स्टॉप परिसर, इत्यादी.

राजीव गांधी पंपिंग :- सच्चाई माता टाकी, संतोष नगर, दत्तनगर, आंबेगाव बुद्रुक, आंबेगाव खुर्द, सुंदा मातानगर, वंडर सिटी, मोरेबाग, श्रीहरी टाकी, बालाजी नगर, पवार हॉस्पिटल परिसर, केदारेश्वर टाकी, सुखसागर नगर मधीलभाग क्रमांक एक व दोन, राजस सोसायटी, उत्कर्ष सोसायटी, सुंदरबन सोसायटी, शेलार मळा, कात्रज गावठाण, भारतनगर, दत्तनगर, जुना प्रभाग ३८ मधील वरखडे नगर तसेच संपूर्ण जुना प्रभाग ४१ व येवलेवाडी परिसर इ.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये