सिनेजगत

भारतातल्या मुली आळशी त्यांना असा नवरा हवा जो… ; सोनाली कुलकर्णींच्या वक्तव्यावर नेटकरी झाले असे व्यक्त

पुणे : लग्नासाठी मुलगा शोधताना मुलींच्या अपेक्षा किती जास्त व अवाजवी असतात, याबद्दल अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने “भारतात खूप साऱ्या मुली आळशी आहेत. त्यांना असा पती किंवा बॉयफ्रेंड हवा असतो, ज्याच्याकडे चांगली नोकरी, घर असेल, पगार वाढण्याची खात्री असेल. पण त्या मुलीत इतकी हिंमत नसते की ती एखाद्या मुलाला म्हणू शकेल की तू माझ्याशी लग्न केल्यावर मी काम करेन.” असे वक्तव्य केल्यावर आता त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

Img 20220425 wa0010281293566257648464944671

सोनाली कुलकर्णी म्हणाली, “तुमच्या घरात अशी स्त्री निर्माण करा, जी स्वतःसाठी कमवू शकेल. जी घरात सामान घ्यायचं असेल तर पतीला अर्धे पैसे देऊ शकेल. मला त्यांनी घरात भांडणं करावीत असं म्हणायचं नाही, पण महिला तितकी सक्षम असावी.” यावेळी तिने एका मैत्रिणीचा किस्सा सांगितला. मैत्रीण लग्नासाठी मुलगा शोधत होती आणि ५० हजारांपेक्षा कमी पगाराचा मुलगा नकोच, एकटा राहत असेल तर खूपच उत्तम, सासू सासरेही नको आणि त्याच्याकडे कार असावी, असं तिचं म्हणणं होतं. मी तिला म्हटलं की तू काय मॉलमध्ये आली आहेस का? तुला मुलगा हवाय की ऑफर हवी आहे. हे खरंच खूप अपमानास्पद आहे.”

https://twitter.com/AmiSri/status/1635967183405690881

“मुलं १८ वर्षांची झाल्यावर त्यांना पैसे कमावण्याचा दबाव असतो. कुटुंबाला हातभार लावण्याची जबाबदारी येते. हे पाहून मला माझ्या या भावांसाठी रडायला येतं. माझा नवरा २० व्या वर्षी नोकरीला लागला आणि पैसे कमवू लागला. का? मुली तर २५-२७ वर्षांच्या होईपर्यंत फक्त विचारच करत असतात. तरी हनिमून भारतात नको परदेशात हवं, असा त्यांचा हट्ट असतो. आता तर विचारूच नका. डेस्टिनेशन वेडिंग्स, प्री-वेडिंग सगळं आलंय आणि त्याचा खर्चही त्या मुलाने करायचा असतो. का? तुम्हाला सर्व ऐशोआराम हवा असेल तर मग तुम्हीही कमवा. तुम्हीही शिका, नोकरी शोधा, चार ऑफिसमध्ये जा, कामासाठी विचारा, असं होत नाही,” असं सोनाली म्हणाली.

“अनेक मुलींचं तर कौतुक केल्यावरही त्या एचआरकडे तक्रार करत असतात. त्याने म्हटलं की असे कपडे का घातले? पण जरा थांबा, आधी त्यांचं पूर्ण म्हणणं तर ऐकून घ्या. खरं तर सगळ्या मुली, महिला अशा असतात असं नाही. पण हे अग्रेशन आणि सतत मागण्या करणारा स्वभाव असलेल्या मुली झपाट्याने वाढत आहेत. मला वाटतं की आपण काही गोष्टींकडे थोडं नम्रता व समानतेनं बघावं. कारण मुलींचीही कुटुंबाप्रती जबाबदारी असतेच. बिलं भरणं, हे फक्त तुमच्या नवऱ्याचं काम नाही. कधीतरी तुमच्या नवऱ्याला म्हणा, पुढचे सहा महिने त्याला सुट्टी आहे आणि त्याच्या चेहऱ्यावरचं हसू बघा,” असं सोनालीने म्हटलंय.

“माझ्या आयुष्यातील सर्व पुरुषांचा मला अभिमान आहे. मला त्यांची काळजी वाटते. जेवण बनवण्याशिवायही कुटुंब किंवा जोडीदारासाठी करता येतील, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. सरकारने एखाद्या क्षेत्रात आरक्षण दिलंय ती वेगळी गोष्टी आहे, ती त्यांची जबाबदारी आहे व ते पार पाडत आहेत. त्याचप्रमाणे काही जबाबदाऱ्या आपल्याही असतात. महिलांनीही त्या जबाबदाऱ्या ओळखण्याची गरज आहे,” असं मत सोनालीने व्यक्त केलं.

सोनाली कुलकर्णी यांच्या वक्तव्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या असून आपण त्या खाली पाहू शकता.

“भारतातील स्त्रिया आळशी आहेत, असं उच्चवर्णीय महिलाच म्हणू शकते. या देशातील महिलांकडे पाहा. कामाचा योग्य मोबदला न मिळणाऱ्या महिलांना त्या गुन्हेगार असल्यासारखं वाटतं. या देशात महिला कोणत्या परिस्थितीतून जातात याचा सरकारी डेटा तुम्ही वाचायला हवा,” असं एका युजरने म्हटलं आहे.

https://twitter.com/Try2StopME/status/1636221138610302977
“यांचं म्हणणं आहे की गृहिणी आळशी असतात, पण नोकरी करणाऱ्या स्त्रिया ज्या आपल्या पती आणि कुटुंबाप्रती कोणतीही जबाबदारी पार पाडत नाहीत त्या आळशी नसतात. पगारी सुट्ट्या नसतानाही जबाबदाऱ्या पार पाडणे हे गृहिणींचे सर्वात कठीण काम आहे,” असं दुसऱ्या एका युजरने म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये