पुणे शहर

पुण्यात रात्रीच्या वेळी चालणारी बांधकामे बंद करावी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची विधानसभेत मागणी

नागपूर : नागरिकांना त्रास होत असल्याने पुण्यात रात्रीच्या वेळी चालणारी बांधकामे बंद करावीत, अशी जोरदार मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी विधानसभेत बोलताना आज (गुरुवारी) केली.

अधिवेशनामध्ये लक्षवेधी मुद्द्यांद्वारे बांधकाम नियमावलीचा विषय शिरोळे यांनी मांडला. यावेळी बोलताना ते म्हणाले, पुणे शहर हे वेगाने वाढत आहे. शहरभर दुप्पट वेगाने बांधकामे सुरु आहेत. अनेक ठिकाणी रात्री बे रात्रीच्या वेळेस बांधकामे चालतात. बांधकामासाठीची वाहने, अवाढव्य यंत्रसामग्री यांच्या आवाजाचा त्रास आजूबाजूच्या ज्येष्ठ नागरिकांना व लहान मुलांना होत असतो.

Img 20231213 1917143278022059532608762 1

याबाबतच्या अनेक तक्रारी माझ्याकडे आलेल्या आहेत. त्यासंदर्भात माहिती घेतल्यानंतर महापालिकेकडून बांधकाम कोणत्या वेळेत सुरू ठेवावे तसेच हे काम करताना आजू‌बाजूच्या नागरिकांना काही त्रास होणार नाही, यासाठी काय काळजी घ्यावी, अशी कोणतीही नियमावली तयार केलेली नाही असे निदर्शनास आले आहे. तरी पुणे महानगरपालिकेस बांधकाम नियमावली करण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी आमदार शिरोळे यांनी केली.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सकाळी ८ ते रात्री १० या वेळेतच बांधकामे करता येतात. त्या व्यतिरिक्तच्या वेळात बांधकामे करता येणार नाहीत, असे आदेश आहेत. पण, हे आदेश डावलून रात्रीच्या वेळी बांधकामे सुरू असतात. ही बाब आमदार शिरोळे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

Img 20231109 wa00107449750233581593236
Img 20230717 wa0012281294586790481769091554
Img 20231109 wa0012281291226259195260975368
Img 20230511 wa0002282292722773256594657904
Img 20230812 wa0001281295283768095978676207
Img 20221228 wa000128229779882107384657043

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये