रॅमिडिसीवर इंजेक्शन काळा बाजारप्रकरणी भाजयुवा मोर्चाचे आंदोलन

पुणे : कोरोना मारामारीच्या वाढत्या प्रादुर्भावावर रॅमिडिसीवर इंजेक्शन हे उपयुक्त ठरत आहे. परंतू प्रशासन व आघाडी सरकार हे उपलब्ध करण्यात अपयशी ठरत आहे.उपलब्ध असलेल्या साठ्यावर काळा बाजार होत आहे. त्याच्या विरोधात अन्न- औषध प्रशासनाच्या गुरुवार पेठ येथील कार्यालयात भाजप युवा मोर्चा पुणे शहराध्यक्ष राघवेंद्र ऊर्फ बापू मानकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता युवा मोर्चा पुणे शहराच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले.
भाजप युवा मोर्चा पुणे शहराध्यक्ष राघवेंद्र ऊर्फ बापू मानकर म्हणाले, सर्वात प्रमुख मागण्या म्हणजे हे इंजेक्शन जास्तीत जास्त मेडिकल दुकानात उपलब्ध करून देण्यात यावे, तसेच ४ विविध कंपन्यांकडून वेगवेगळ्या दरात हे इंजेक्शन विकले जात आहे. या औषधाचा पुरवठा चार कंपन्या करतात.त्यामध्ये कॅडेला ची किंमत २८००रुपये सिपला ची किंमत ४०००रुपये ज्यूबिलट ची किंमत ४७००रुपये हेटरो ची किंमत ५४००रुपये अशी आहे पण या संकट काळात एकच समान किंमत सर्वसामान्यांना परवडेल अशी माफक किंमत होणे अपेक्षित आहे. हेटरो कंपनी दररोज ३०००० लशी पुणे जिल्ह्यात पाठवते तिथून हे औषध इतर ठिकाणी चढ्या किमतीने विकले जाते. हे दुर्दैवी आहे त्यामुळे प्रशासनाने हे औषध सर्वसामान्य जनते ला परवडेल अशा किमतीत विकण्याचे आदेश संबंधित कंपन्यांना द्यावे. त्यात एकच आणि कमी दर ठेवण्यात यावा, तसेच जास्त दराने इंजेक्शन विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कडक कारवाई करावी.
यावेळी भाजयुमो शहराध्यक्ष राघवेंद्र बापू मानकर, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष स्वरदाताई बापट, भाजयुमो शहर सरचिटणीस प्रतीक देसर्डा, भाजयुमो शहर सरचिटणीस निहाल घोडके, भाजयुमो शहर सरचिटणीस अभिजीत राऊत, भाजयुमो शहर सरचिटणीस अरविंद गोरे, भाजयुमो शहर सरचिटणीस अक्षय वायाळ, भाजयुमो कसबा मतदारसंघ अध्यक्ष अमित कंक, भाजयुमो शिवाजीनगर मतदारसंघ अध्यक्ष अपूर्व खाडे, भाजयुमो कोथरूड मतदारसंघ दुष्यंत मोहोळ,भाजयुमो वडगाव शेरी मतदारसंघ अध्यक्ष राहुल दळवी तसेच शहर भाजयुमोचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
येत्या काळात रॅमिडिसीवर इंजेक्शन बाबत सकारात्मक उपाययोजना नाही झाल्यास भाजयुमो तीव्र आंदोलन करेल. असा इशाराही मानकर यांनी दिला आहे.



