पुणे शहर

रोज १० लाख रुपये दंड वसुलीचा पुणे महापालिकेचा आदेश कितपत योग्य ; पुणे पालिकेतील सत्ताधारी भाजप झोपलय काय : दिपाली धुमाळ

पुणे : pune city कोरोना काळात सर्वच व्यावसायिकांचे उत्पन्न कमी झाले आहे पथारी व्यावसायिकांवर तर उपासमारीची वेळ आली आहे गोरगरिबांना जगण्याची भ्रांत असताना महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभाकडून काढण्यात आलेले दैनंदिन 10 लाख रुपये दंड सक्तवसुलीचे आदेश  कितपत योग्य आहेत असा प्रश्न उपस्थित करत हे आदेश ताबडतोब मागे घेण्याची मागणी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी केली आहे. हा निर्णय घेत असताना महापालिकेतील सत्ताधारी भाजप झोपल होतं का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे उपयुक्त माधव जगताप यांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत दंडात्मक कारवाई वाढवून रोज १० लाख रुपये दंड गोळा करण्याचे उद्दिष्टे सर्व क्षेत्रीय कार्यालयांना दिले असल्याने याबाबत सर्वच स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. 

धुमाळ यांनी म्हंटले आहे की, महापालिकेचे उत्पन्न वाढवायचे असेल  मिळकत कर वसूल करण्यावर भर दिला पाहिजे तसेच ज्या मिळकतीवर टॅक्स लावला नाही त्या शोधून टॅक्स लावला पाहिजे. खर्चात बचत म्हणजे देखील उत्पन्न असते. कोट्यवधी चे टेंडर रिंग न करता कसे होतील यावर जरी भर दिला तरी करोडो रुपये वाचणार आहेत.

कामे न करता बिले देणे यावर लक्ष दिले पाहिजे,
पण सत्ताधारी यांच्या दबावाने मोठे घोटाळे करायचे आणि मग गोरगरिबांना नाहक त्रास द्यायचा असला तुघलकी कारभार बंद करा अन्यथा आंदोलनाला सामोरे जा असा इशारा धुमाळ यांनी दिला आहे. महापालिकेत सत्ताधारी भाजपकडून असा चुकीचा कारभार सुरू असल्याने पुणेकर येत्या निवडणुकीत त्यांना नक्कीच धडा शिकवतील असा इशारा त्यांनी दिला आहे.

Img 20210818 wa0002

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये