राष्ट्रीय

भारतात कोरोना लशीला सशर्त मंजुरी

नवी दिल्ली : प्रतीक्षा असलेली कोरोना लस Corona Vaccine अखेर भारतात उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी भारतासाठी ही दिलासा देणारी बातमी आली आहे.

Oxford-AstraZeneca Vaccine ची लस तातडीच्या वापरासाठी परवानगी मिळण्यास हिरवा कंदिल दाखवण्यात आला आहे. लशीबद्दल निर्णय घेण्यासाठी नेमलेल्या तज्ज्ञ समितीने याबाबतचा अहवाल दिला असून पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटने तयार केलेल्या कोव्हिशील्ड (Oxford-AstraZeneca Covishield Vaccine) लशीसाठी सशर्त परवानगी द्यायला हरकत नसल्याचं सांगितलं आहे.

आता औषध नियंत्रक महासंचालकांनी लशीसाठी परवानगी दिली की, सर्वसामान्यांसाठी ही लस लवकरच उपलब्ध होऊ शकेल. औषध महानियंत्रकही Corona Vaccine ला परवानगी देतील. एकदा Central Drugs Standard Control Organization (CDSCO) ने परवानगी दिली की भारतात कोरोना लसीकरणाचा मार्ग मोकळा होईल. या कोरोना लशीच्या व्यावसायिक उपयोगाला पूर्वपरवानगी असेल तरच (conditional marketing authorisation) मान्यता देण्यात आली आहे.

1609323038998 udyam bank big advt 30 dec 2020

भारतातले सर्वात मोठे लसउत्पादक असणाऱ्या पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे प्रमुख आदर पुनावाला (adar poonawalla serum institute of india ) यांनी आपल्याकडे 7.50 कोटी डोस तयार असल्याची माहिती दिली. लशीला परवानगी मिळताच पुढच्या आठवड्याभरात 100 मिलियन म्हणजे 10 कोटी डोस तयार असतील, असं त्यांनी सांगितलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये