शहरातील रिंग रोड च्या आराखडा बदलास काँग्रेसचा विरोध

पुणे : मूठभर बांधकाम व्यावसायिकांचे हित डोळ्यासमोर ठेवून शहरातील रिंग रोड (एचसीएमटीआर) च्या आराखड्यातील बदल काँग्रेस पक्षाला मान्य नाहीत, असे काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष आबा बागुल यांनी जाहीर केले.राज्य सरकारने फेरबदलासह रिंग रोड प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न केल्यास न्यायालयात आव्हान देऊ, असा इशारा आबा बागुल यांनी दिला आहे.
रिंग रोड मार्गावर राज्य सरकारने २६ ठिकाणी बदल केले आहेत. हे बदल बांधकाम व्यावसायिकांचे हित जपण्याच्या उद्देशाने केलेले आहेत तसेच हे बदल पहाता आणि त्याला मोठा विरोध होईल हे जाणवले असताही राज्य सरकारने मंजुरी दिली. त्यामुळे सरकारला हा प्रकल्प खरच पूर्ण करायचा आहे का? अशी शंका मनात येते. असे बागुल यांनी सांगितले. कोणत्या बांधकाम व्यावसायिकांचे हित जपण्यासाठी हे बदल करण्यात आले आहेत? याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी जाहीर करावी, अशी मागणी ही बागुल यांनी केली आहे.
शहरात अलीकडच्या काळात अपघातांचे प्रमाण वाढल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. यावर गांभीर्याने उपाययोजना करण्या ऐवजी बिल्डरांचे हित साधणारा निर्णय राज्य सरकारने घेतला, असा आरोप बागुल यांनी केला आहे.








































