कोथरुडपुणे शहर

राष्ट्रवादी काँग्रेस कोथरूड मतदारसंघाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; हर्षवर्धन मानकर यांचा समाजपयोगी उपक्रम

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस कोथरूड मतदारसंघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये २५० पिशव्या रक्त संकलित करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराध्यक्ष आणि माजी उपमहापौर दीपक मानकर, आयोजक राष्ट्रवादी काँग्रेस कोथरूड मतदारसंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन मानकर,  नवनाथ खिलारे, निलेश शिंदे,धनंजय पायगुडे, जावेद शेख, सुनील वडवेराव, भूषण शिर्के, दिलीप कानडे, संतोष बराटे, सचिन जोरी,दत्तात्रय गायकवाड, विजय बाबर,कांताताई खिलारे, पुजाताई शिर्के हे उपस्थित होते. यावेळी सहभागी रक्तदात्यांना तर्पण ब्लड सेंटर यांचं सन्मानपत्र व छत्री देण्यात आले.

हर्षवर्धन मानकर म्हणाले, अजितदादांचा वाढदिवस समाजपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात येत आहे. याच संकल्पनेतून राष्ट्रवादी काँग्रेस कोथरूड मतदारसंघाच्या वतीने आज रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून करण्यात आलेल्या रक्त संकलनातून अनेक रुग्णांना उपयोग होणार आहे.

Screenshot 2023 07 17 18 08 38 30
Img 20230511 wa0002281296351682306326034196
Img 20221228 wa00016208176808646242256

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये