पुणे शहर

पुणे विमानतळ ते पूना हॉस्पिटल आज रात्री नऊ वाजता ग्रीन कॅारिडॅार; अपघातग्रस्त रुग्णांच्या मदतीसाठी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या सूचना

पुणे : सिंहगड रोड येथील लोहपात्रे कुटुंबिय सहपरिवार (पती, पत्नी, मुलगा) अंदमान निकोबार/ पोर्ट ब्लेअर येथे सहपरिवार फिरायला गेले होते. काल २६ मार्च रोजी संध्याकाळी शोभना मंगेश लोहपात्रे यांचा एका छोट्या बेटावर जबरदस्त अपघात झाला. त्यांच्या दुचाकीला एक भरधाव वाहनाने उडवले. त्या छोट्या बेटावर वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्याने रात्री उशिरा केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या मदतीने त्यांना उपचारांसाठी एअरफोर्सच्या मदतीने अंदमान/ पोर्ट ब्लेयर येथे रात्री १.३०-२ वाजता आणले. त्यांच्या डोक्याला मोठा मार लागल्याने अंतर्गत रक्तस्त्राव झाला आहे.

आज सकाळी मुरलीधर मोहोळ यांच्या मदतीने एक Air Ambulance उपलब्ध झाली असून आज रात्री ९ वाजता ही Air Ambulance पुणे विमानतळावर येणार आहे.

मुरलीधर मोहोळ यांनी तिथून पूना हॉस्पिटलपर्यंत पुणे पोलिसांना ग्रीन कॉरिडॉर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शोभना यांच्या उपचारांसाठी एक एक मिनिट महत्वाचा आहे.

नुकताच थायलंड फुकेत येथे अपघात ग्रस्त झालेल्या दांपत्यास मायदेशी परत आणण्यास यश आले होते. त्यांचावर पुण्यात उपचार सुरू आहेत. तीच तत्परता दाखवत मुरलीधर मोहोळ यांनी अंदमान निकोबार येथे फिरावयास गेलेल्या कुटुंबाला देखील मदत मिळवून देत एअर अँब्युलन्स द्वारे मदत केली आहे.

Screenshot 20250327 192122 samsungnotes6439383861966424262
Img 20250310 wa02324095435649637866308
Img 20250310 wa02282851203640248970727

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये