ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्तींच्या गृह मतदानास सुरुवात; मेघा अग्रवाल यांनी बजावला मतदानाचा हक्क

पुणे : ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्तींच्या गृह मतदानास सुरुवात करण्यात आली आहे.महाराष्ट्रात विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे यामध्ये 85 वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिक तसेच 45% पुढील दिव्यांग व्यक्तींना गृह मतदान करून घेण्याची सोय करून घेण्यात आली आहे त्याची सुरुवात दिनांक 15 तारखेपासून सुरू झाली.
कोथरूड मतदारसंघातील अग्रवाल समाज पुणे चे सचिव अमित अग्रवाल यांच्या पत्नी मेघा अग्रवाल यांचा पाच वर्षांपूर्वी अपघात झाला होता यामध्ये त्यांना 90% अपंगत्व आले. अमित अग्रवाल यांनी संबंधित बीएलओ यांच्याशी संपर्क करून मेघा अग्रवाल यांचा बारा नंबर फॉर्म भरून दिला त्यानंतर निवडणुकी चे अधिकारी सर्व यंत्रणेसह त्यांच्या घरी आले व मतदान करून घेतले.
यावेळी बोलताना मेघा अग्रवाल म्हणाल्या लोकसभेच्या वेळी निवडणुकीच्या वेळेला माझ्याकडे दिव्यांग प्रमाणपत्र नसल्याने मला बूथ वर जाऊन मतदान करावे लागले आता प्रमाणपत्र असल्याने तो फॉर्म भरून दिला व मला खूपच आनंद झाला की मला घरी बसून मतदान करता आले माझं सर्वांना आवाहन आहे मतदान करून मी माझे कर्तव्य पार पाडले आहे आपणही मतदान करून राष्ट्रहिताचे कर्तव्य पार पाडावे.










