उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोथरूडमध्ये आरोग्य तपासणी शिबिर; माजी नगरसेवक योगेश मोकाटे यांचा उपक्रम

पुणे : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोथरुड विधानसभा मतदारसंघाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज स्मारक चौक कोथरुड येथे मोफत नेत्र चिकीत्सा, डायबेटीस,बीपी , हिमोग्लोबीन तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शेकडो नागरिकांनी या शिबिरात सहभागी होत आरोग्य तपासणी करुन घेतली.
एमरल्ड आय हॉस्पीटल व दवा इंडिया यांच्या सौजन्याने हे शिबीर पार पडले. शिबीराचे उद्घाटन माजी आमदार चंद्रकांत मोकाटे व ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दिलीप जानोरकर,कांता बराटे,नितीन शिंदे,किशोर सोनार,अमित भगत,श्रीपाद पोरे, प्रणित तासगांवकर,तसेच प्रबोधन विचारधारा संस्थेचे पदाधिकारी व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमाने साजरा व्हावा या उद्देशाने आरोग्य तपासणी शिबीरांचे आयोजन करण्यात आल्याचे संयोजक ॲड.योगेश मोकाटे यांनी यावेळी सांगितले. तसेच उपस्थित नागरिक व पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले.













