नागरिकांनी केवळ आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष काम करणाऱ्या आणि सातत्याने संपर्कात राहणाऱ्या व्यक्तींच्या मागे उभे राहावे -हर्षवर्धन मानकर

प्रभाग क्रमांक 11 रामबाग कॉलनी शिवतीर्थ नगर प्रभागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार हर्षवर्धन मानकर, तृप्ती शिंदे, कांता खिलारे यांचा सोसायटी भागातील नागरिकांशी संवाद
पुणे : पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ प्रभाग क्र. 11 रामबाग कॉलनी शिवतीर्थ नगर मधील विविध सोसायटी भागात नागरिकांशी गाठीभेटी घेतल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार हर्षवर्धन दीपक मानकर, तृप्ती निलेश शिंदे आणि कांता नवनाथ खिलारे यांनी रामबाग कॉलनी, माजी सैनिक वसाहत, सिग्मा वन, स्वयंसिद्धा सोसायटी, ऋतुजा सोसायटी अशा विविध सोसायटीना भेट दिली.
या भेटीदरम्यान सोसायटीतील दैनंदिन नागरी प्रश्न, पायाभूत सुविधा, परिसरातील वाहतूक व्यवस्था, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि सुरक्षिततेसंदर्भातील मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. यावेळी परिसराच्या नियोजित विकासासाठी आपली दिशा, प्राधान्यक्रम आणि कार्यपद्धती नागरिकांसमोर मांडली. येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना पाठिंबा देण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.

नागरिकांच्या सहकार्याने सोसायटी भागासहित संपूर्ण प्रभागाचा समतोल, सुरक्षित आणि शाश्वत विकास साधण्यासाठी पुढील काळात अधिक प्रभावी, पारदर्शक आणि लोकाभिमुख काम करत राहण्याचा ठाम निर्धार हर्षवर्धन मानकर यांनी व्यक्त केला.
त्याचप्रमाणे प्रभागामधील किश्किन्धा नगर, राऊतवाडी, केळेवाडी या वस्तीभागात कोपरा सभा देखील घेण्यात आल्या. यावेळी बाल तरुण मित्र मंडळ, बाल शिवाजी मित्र मंडळ, शिवशक्ती मित्र मंडळ, अचानक मित्र मंडळ, लहुजी मित्र मंडळ, छोटा जवान मित्र मंडळ, म्हाळसाकांत सेवा ट्रस्ट अशा विविध गणेश मंडळानी देखील उस्फुर्त प्रतिसाद नोंदवला.



