महाराष्ट्र
आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते हनुमंत साठे यांचे निधन

पुणे : आंबेडकरी चळवळीत कार्यकर्ते आणि रिपब्लिकन पक्षाच्या मातंग आघाडीचे हनुमंत साठे यांचे निधन झाले आहे. लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांचे वाटेगाव येथील त्यांच्या घराचे पहिल्यांदा पुनर्वसन त्यांनी केले. विविध सामाजिक प्रश्नांसाठी साठे यांनी कायम लढा दिला.
मागील ३० वर्षापासून सामाजिक कार्य करीत असताना त्यांनी मातंग व इतर जातीतील समाजाला एकत्र करण्यासाठी योगदान दिले. पुण्यासह महाराष्ट्रभर त्यांच्या कामातून त्यांची ओळख निर्माण झाली. त्यांच्या मागे मुलगा विरेन ,पत्नी सत्यभामा ,सून आणि नातवंडे असा परिवार आहे. दुपारी 3 वाजता धनकवडी येथे त्यांच्या अंत्यसंस्कार प्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत राहणार आहेत.



