शरद पवारांनी पक्षाच्या अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याचा निर्णय केला जाहीर ; कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ..घोषणाबाजी

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या ‘लोकमाझे सांगाती’ या पुस्तकाचे प्रकाशन कार्यक्रमावेळी पवार यांनी धक्कादायक निर्णय जाहीर केला. आपण पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होत असल्याचा निर्णय पवार यांनी जाहीर करताच कार्यकर्त्यांनी गोंधळ सुरू केला. निर्णय मागे घ्या अशा घोषणा कार्यकर्त्यांनी द्यायला सुरवात केली. कार्यकर्त्यांना शांत करताना सुप्रिया सुळे व अजित पवार यांचीही दमछाक झाली. शरद पवार यांनी निर्णय जाहीर केल्यानंतर उपस्थित असलेल्या त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार याही भावूक झाल्याचे पाहिला मिळाले.
लोकमाझे सांगाती’ या पुस्तकातून शरद पवार यांनी अत्यंत धक्कादायक खुलासे केले आहेत. महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडेल असे हे धक्कादायक खुलासे आहेत. या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात शरद पवार यांनी अनेक आठवणी सांगितल्या. यावेळी शरद पवार पक्षाच्या अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर करतील असे कोणालाच वाटले नव्हते. पण त्यांच्या या निर्णयाने पक्षातील नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत सर्वच जन आवक झाले.
पवार यांनी हा निर्णय जाहीर केल्यानंतर एकच गोंधळ उडाला. निर्णय मागे घ्या अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या तर काही नेत्यांनी शरद पवार यांचे पाय पकडून निर्णय मागे घेण्याची विनंती केली. यावेळी या निर्णयावर समिती नेमण्यात येईल व समिती जो निर्णय घेईल तो पवार साहेब मान्य करतील असे अजित पवार यांनी जाहीर केले, पण आत्ताच निर्णय घ्या असा हट्ट कार्यकर्त्यांकडून धरण्यात आला. आता या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी पक्षात पुढे काय घडणार हे पहावे लागणार आहे.




