पुणे शहर

वारजे माळवाडीत अवैध गावठी दारू धंद्यांवर छापे मारत 2 जणांना अटक ; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई..

पुणे- पुणे येथील निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, डी विभाग स्टाफने वारजे माळवाडी येथील अमर भारत सोसायटी, गोकुळनगर येथील अवैध गावठी दारू विक्रीच्या ठिकाणी अचानकपणे बेधडकपणे छापे मारून १०१० लिटर गावठी दारू जप्त करत ५३६०० किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. 2 arrested for raiding illegal village liquor shops in Warje Malwadi;  Action of State Excise Department.

या कारवाईत दोन जणांना जागीच पकडून त्यांच्याकडून 1010 लिटर गावठी दारू व इतर मुद्देमालासह रु. 53,600/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करून वारस गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.

सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उप-आयुक्त प्रसाद सुर्वे, अधीक्षक संतोष झगडे, उप-अधीक्षक संजय आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डी विभागाचे निरीक्षक संजय डेरे, उप-निरीक्षक- तानाजी शिंदे, गणेश केंद्रे यांनी केली. सदर कारवाईत जवान सर्वश्री समीर पडवळ, दत्तात्रय पिलावरे, शरद भोर यांनी सहभाग घेतला.

Img 20210724 wa0001

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये