विद्यार्थी आणि खेळाडू यांच्या आहारातील पालकांचे योगदान ; संदीप वांजळे यांचे मार्गदर्शन पालकांसाठी ठरले मोलाचे

ओंकार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने चर्चासत्राचे आयोजन
कर्वेनगर : भारतीय आहार, खाद्यपदार्थ तसेच निसर्गाशी समरूप असणारा आहार यांचे महत्व, लहान मुलांच्या वाढत्या वयातील पालकांची आहाराबाबत भूमिका, खेळाडूंचा यथायोग्य आहार अशा सर्वच कक्षांना स्पर्श करत क्रीडा मार्गदर्शक व प्रशिक्षक संदीप वांजळे यांनी केलेले मार्गदर्शन पालकांसाठी मोलाचे ठरले.
सध्या धकाधकीचे जीवन आणि सकस आहाराचा अभाव यामुळे सर्वांच्याच जीवनमानावर विपरीत परिणाम होत आहे. या अनुषंगाने ओंकार चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून ‘विद्यार्थी आणि खेळाडू यांच्या आहारातील पालकांचे योगदान’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ओंकार चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष स्वप्नील दुधाने, माजी नगरसेविका लक्ष्मी दुधाने उपस्थित होते.
कर्वेनगर परिसरातील रहिवासी असणारे क्रीडा मार्गदर्शक व प्रशिक्षक संदीप वांजळे यांनी उत्कृष्टपणे स्पष्टीकरण देत आपल्या जीवनातील आहाराचे महत्व अधोरेखित केले.
सदर उपक्रम सर्वांच्याच विशेष पसंतीस उतरला असून याबाबत अनेक सकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. या प्रतिक्रिया आमच्यासाठी प्रेरणादायी असून भविष्यातही असे अनेक उपक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे स्वप्नील दुधाने यांनी सांगितले.










