महाराष्ट्र लॉकडाऊन- रात्री 8 नंतर बाहेर पडाल तर होईल शिक्षा ; राज्यात आजपासून कडक निर्बंध

मुंबई : कोरोनाव्हायरसचा प्रकोप राज्यात प्रचंड वाढल्यानंतर आणि आवाहन करूनही लोकांची गर्दी कमी होत नाही, हे लक्षात आल्यानंतर राज्याने निर्बंध अधिक कडक केले आहेत. आजपासूनच 27 मार्च मध्यरात्रीपासून हे कडक निर्बंध लागू होणार आहेत. रात्री 8 ते सकाळी 7 दरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता बाहेर पडू नये असं सांगण्यात आलं आहे. पाच जणांपेक्षा अधिक माणसांनी एकत्र बाहेर पडण्यावर बंदी आहे. मास्क न लावल्यास, रस्त्यावर थुंकल्यास, सोशल डिस्टन्सिंगचं पालन न करणाऱ्यास तातडीने दंड करण्यात येईल. या कुठल्याही नियमाचं पालन न करणाऱ्यांना जागच्या जागी दंड करण्याचा आदेश देण्यात आला आहे.If you go out after 8 pm, there will be punishment; Strict restrictions in the state from today

रात्री 8 ते सकाळी 7 पर्यंत सर्व सार्वजनिक आस्थापना बंद राहतील. हॉटेल, बार, सिनेमागृहसुद्धा रात्री आठ नंतर बंद होतील. या काळात होम डिलिव्हरी सर्व्हिस मात्र सुरू राहील. मास्क न लावता कुणीही व्यक्ती आढळली तर 500 रुपयांचा दंड करण्यात येणार आहे. रस्त्यावर थुंकल्यास 1000 रुपये वसूल करण्यात येतील.
फेस कव्हरिंग्ज – सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी फेस कव्हर घालणे अनिवार्य आहे.नियमाचं उल्लंघन झालं तर 500 रुपये दंड
सामाजिक अंतर – Social distancing च्या नियमानुसार किमान 6 फुटांचं अंतर एकमेकांमध्ये ठेवणं बंधनकारक आहे.
दुकानं, रेस्टॉरंट, मॉल आदी ठिकाणी ग्राहकांमधील सोशल डिस्टन्सिंग दिसलं नाही तर कडक कारवाई. एका वेळीपाचपेक्षा जास्त लोकांना परवानगी देणार नाहीत.
सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास 1000 रुपयांचा दंड वसूल करण्यात येईल. सार्वजनिक ठिकाणी दारू, पान, गुटखा, तंबाखू, सीटीसी वापरण्यास मनाई आहे.
Work from Home – शक्य असेल तेथे घरूनच काम करण्याचे आदेश. बाजारपेठा, खासगी आणि सरकारी ऑफिस इथे पूर्ण संख्येने कर्मचारी नसतील.
कामाच्या ठिकाणी, बाजारपेठांमध्येही किमान 6 फुटांचं अंतर दोन व्यक्तींमध्ये असलंच पाहिजे. त्यासाठी शिफ्टमध्ये काम करावं. कर्मचार्यांचे लंच ब्रेक अगदी लिफ्टमधल्या गर्दीवरही नियंत्रण ठेवण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.
गृह विलगीकरण – एखाद्या व्यक्तीला कोरोना झाला आणि त्याला घरीच विलगीकरणात राहण्याचा सल्ला मिळाला, तर अशा घरावर, सोसायटीवर किमान 14 दिवस कोविड पॉझिटिव्ह व्यक्ती घरात आहे, अशी पाटी लावण्यात यावी.



