राष्ट्रीय

राहुल गांधी ईडी कार्यालयात दाखल

नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रकरणी केंद्रीय तपास यंत्रणा सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अलीकडेच काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांना चौकशीसाठी समन्स जारी केला होता. त्यानुसार राहुल गांधी ईडी कार्यालयात हजर झाले आहेत. यावेळी ईडी कार्यालयाबाहेर शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी गर्दी केली. सोनिया गांधी यांची प्रकृती ठीक नसल्याने त्या चौकशीसाठी हजर राहू शकल्या नाहीत.

Img 20220610 wa0330

ईडी कार्यालयाबाहेर पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. राहुल गांधी यांच्यासोबत प्रियांका गांधी देखील ईडी कार्यालयात दाखल झाल्याचीही माहिती समोर आली आहे.

Img 20220521 wa0000

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये