महाराष्ट्र

झोपडपट्टीत अमली पदार्थांचा फैलाव; शाळेतील मुलेही लक्ष्य

मुंबई : झोपडपट्टी परिसरात अमली पदार्थांचा विळखा वाढत आहे. यामुळे देशाचे भविष्य उद्ध्वस्त होत आहेच, शिवाय अनेक कुटुंबांच्या आशा, आकांक्षा यांनाही धक्का बसत आहे. यामागे फार मोठे रॅकेट आहे. आता शाळेतील मुलेही लक्ष्य होत आहेत. मध्यमवर्गीय गृहनिर्माण संस्थांमध्येही याचा प्रसार होत आहे. झोपडपट्टी परिसरातील अमली पदार्थांचा फैलाव थांबवावा,’ अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी केली आहे.

‘गुजरातमधील बंदरांमध्ये हजारो किलो अमली पदार्थ येत आहेत, पण त्याच्या मूळाशी तपास यंत्रणा पोहोचत नाहीत. या अमली पदार्थांचा या समस्येशी संबंध आहे का, याच्या चौकशीची गरज आहे,’ असे सावंत म्हणाले. ‘या समस्येकडे पाहताना भाजपचा दृष्टिकोन केवळ राजकीय आहे. नार्कोटिक्स कंट्रोल विभाग केवळ अमली पदार्थ घेणाऱ्यांच्या मागे दिसला, पण अमली पदार्थ विकणारे पकडले जात नाहीत,’ याकडेही त्यांनी लक्ष वेधले. प्रत्येक झोपडपट्टीमध्ये नशामुक्ती केंद्र असावे, अशी मागणी लवकरच करू, असे ते म्हणाले.

Img 20230110 wa00053052482550557119128

वेगवेगळ्या संस्थांच्या प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाला सोबत घेऊन सचिन सावंत यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांसह उत्तर मुंबई विभागाच्या अतिरिक्त पोलिस आयुक्त राजीव जैन यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी झोपडपट्टी परिसरातील अमली पदार्थांचा फैलाव थांबवावा, अशी मागणी केली.

Img 20230109 wa00053626285548501344433
Img 20221228 wa0001281294303512961784024189

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये