कचरा वेचकांच्या मुलांनी पथनाट्यातून दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश..

कर्वेनगर : pune city जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कचरा गोळा करणाऱ्या महिलांच्या मुलांनी जनजागृतीपर पथनाट्य सादर करत पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. या पथनाट्यातून मुलांनी प्लास्टिकचा वापर टाळा पर्यावरणाचे रक्षण करा असा महत्त्वपूर्ण संदेश दिला.
पर्यावरणाचा समतोल राखण्याचा व एक तरी झाड लावून पर्यावरणाचे रक्षण करण्याचा संकल्प करत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कर्वेनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन मीना मोरे, मंदाकिनी वनसाळे व उर्मिला गायकवाड यांच्या वतीने करण्यात आले होते.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अध्यक्ष किशोर कांबळे, आनंद तांबे, मधुकर भगत, अज्जू शेख, सुवर्ण खेडकर, विमल खंडागळे, श्रृती पवार, स्वाती जोरी उपस्थित होते. पथ नाट्यातून पर्यावरण रक्षणाचा संदेश देणाऱ्या मुलांचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.




