महाराष्ट्र

राज्यातील जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर..

मुंबई,  : महाराष्ट्र राज्याचे मंत्री आणि राज्यमंत्री यांची जिल्हा पालकमंत्री तसेच सह-पालकमंत्री म्हणून सामान्य प्रशासन विभागाने नियुक्ती केली आहे. यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद असणार आहे तर ॲड. आशिष जयस्वाल यांच्याकडे गडचिरोलीचे सहपालकमंत्रीपद सोपविण्यात आले आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबई शहर आणि ठाणे या दोन जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे आणि बीड या दोन जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे.

Img 20240404 wa0017281298374058713843994116

उर्वरित जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची व सहपालकमंत्रीपदाची जबाबदारी पुढीलप्रमाणे :

नागपूर व अमरावती : चंद्रशेखर बावनकुळे,

अहिल्यानगर : राधाकृष्ण विखे-पाटील,

वाशीम : हसन मुश्रीफ,

सांगली : चंद्रकांत पाटील,

नाशिक : गिरीश महाजन,

पालघर : गणेश नाईक,

जळगाव : गुलाबराव पाटील,

यवतमाळ : संजय राठोड,

मुंबई उपनगर : ॲड.आशिष शेलार तर सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा,

रत्नागिरी : उदय सामंत,

धुळे : जयकुमार रावल,

जालना : श्रीमती पंकजा मुंडे,

नांदेड : अतुल सावे,

चंद्रपूर : डॉ.अशोक उईके,

सातारा : शंभूराज देसाई,

रायगड : कु.आदिती तटकरे,

लातूर : शिवेंद्रसिंह भोसले,

नंदुरबार : ॲड.माणिकराव कोकाटे,

सोलापूर : जयकुमार गोरे,

हिंगोली : नरहरी झिरवाळ,

भंडारा : संजय सावकारे,

छत्रपती संभाजीनगर : संजय शिरसाट,

धाराशिव : प्रताप सरनाईक,

बुलढाणा : मकरंद जाधव (पाटील),

सिंधुदुर्ग : नितेश राणे,

अकोला : आकाश फुंडकर,

गोंदिया : बाबासाहेब पाटील,

कोल्हापूर : प्रकाश आबिटकर तर सहपालकमंत्री श्रीमती माधुरी मिसाळ,

वर्धा : डॉ.पंकज भोयर आणि

परभणी : श्रीमती मेघना बोर्डीकर

Img 20240404 wa0013281293529802052601663206

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये