पुणे शहर

पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या कर्वेनगर परिवर्तन आघाडीच्या चिंतन बैठकीची राजकीय वर्तुळात चर्चा.. काय झाले बैठकीत..

पुणे : महापालिका निवडणुकीच्या प्रक्रिया सुरू झाली असल्याने राजकीय वातावरण तापू लागले आहे. कर्वेनगर भागात राजकीय घडामोडी सुरू झाल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. चार वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या कर्वेनगर परिवर्तन आघाडीची येऊ घातलेल्या पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोणजे येथे चिंतन बैठक पार पडली. या बैठकीची चर्चा सध्या कर्वेननगरच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. कर्वेनगर परिवर्तन आघाडी आगामी महापालिका निवडणुकीत कर्वेनगर भागात महत्वाची भूमिका बजावेल असे बोलले जात आहे.

Screenshot 20250508 083342 samsungnotes1092093488754539978

काय झाले कर्वेनगर परिवर्तन आघाडीच्या बैठकीत..

कर्वेनगरमधील भयावह वाहतूक समस्या, डीपी रस्त्यांची अनावस्था, कचरामय कर्वेनगर, कर्वेनगर मधील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न विविध विषयावर चर्चा करून येत्या महानगरपालिका निवडणुकीत कर्वेनगर मध्ये परिवर्तन घडवण्याचा दृढनिश्चय, या संकल्प या बैठकीत करण्यात आला आहे. 

सुनिल तोडकर यांनी उपस्थितीत पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे स्वागत करून सुरू झालेल्या या बैठकीत सुरवातीला कर्वेनगर परिवर्तन आघाडीचे संयोजक म्हणून हिंदुराव पाटील, चंद्रकांत अप्पा बराटे, बाजीराव मासाळ आणि संभाजी बराटे यांची संयोजक म्हणून निवड करण्याचा प्रस्ताव बाळासाहेब बराटे यांनी मांडला त्यास सर्वांनी अनुमोदन दिले. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकामध्ये  नागरी समस्याना प्राधान्य आहे, सामान्य नागरिक महापालिकेला कर भरतो तर त्यांना सुविधा मिळणे हा त्याचा हक्क आहे, येत्या  निवडणुकीत कर्वेनगर परिवर्तन आघाडी  राजकीय पक्षाचे  झेंडे बाजूला ठेवून फक्त कर्वेनगरच्या शाश्वत विकासाचा  अजेंडाच जनतेपुढे ठेवेल आणि कर्वेनगरची जनता सुज्ञ आहे परिवर्तन निश्चितच घडवेल असा विश्वास पतित पावन संघटनेचे नेते आणि परिवर्तन आघाडीचे संयोजक हिंदुराव पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

Img 20250618 wa02555226425519435283235

“कर्वेनगरमधील जवळपास वीस हजार रहिवाशी असलेल्या भागाला  लहान मुलासाठी खेळाचे मैदान , जेष्ठ नागरिकांना उद्यान, समाजमंदिर, युवकांना व्यायामशाळा हे मागील दहा, पंधरा वर्षात झाले नाही, महर्षी कर्वेची कर्मभूमी म्हणून ओळखले जाणारे कर्वेनगर आज बकालनगर,समस्यानगर, बेकायदेशीर  कामे गुन्हेगारी कृत्याचे आगर म्हणून कुप्रसिद्ध झाले, हे पुसण्यासाठी कर्वेनगर परिवर्तन आघाडी  मागिल चार वर्षांपासून काम करीत आहे आता परिवर्तन हा आमचा ध्यास आहे “असे शिवसेना उबाठाचे नेते आणि परिवर्तन आघाडीचे संयोजक चंद्रकांत अप्पा बराटे यांनी यावेळी  सांगितले..

कर्वेनगर परिवर्तन आघाडी ही कोणत्याही राजकीय पक्षाच्या विरोधात नसून कर्वेनगरचा सांस्कृतिक वैचारिक वारसा जपण्यासाठीआणि सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कासाठी,हितासाठी परिवर्तन आघाडी काम करत आहे, 1987 च्या डीपीमधील रस्ते आजतागायत होऊ शकले नाहीत. येथील जागा मालकांचे अनेक प्रश्न पुणे महानगरपालिका आणि मंत्रालयात प्रलंबित आहेत, खऱ्या अर्थानं अभ्यासू,कार्यक्षम आणि  जनहिताची तळमळ असणाऱ्या नेतृत्वाची कर्वेनगरला गरज आहे असे संस्थापक सदस्य बाळासाहेब बराटे यांनी यावेळी सांगितले.

कर्वेनगर परिवर्तन आघाडीचा कर्वेनगरच्या शाश्वत विकासाचा अजेंडा  राबवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत, याकरिता कर्वेनगर परिवर्तन आघाडीने आम्हाला साथ द्यावी असे आवाहन  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष माणिकशेठ  दुधाने, काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष  विजय खळदकर, ठाकरे  शिवसेनेचे जगदीश दिघे, संजय नानासाहेब बराटे, शिंदे शिवसेनेचे सचिन थोरात, अनिकेत जावळकर, यांनी विश्वास व्यक्त केला. याप्रसंगी परिवर्तन आघाडीचे संस्थापक सदस्य संजय साळुंखे यांनी उपस्थिताचे आभार मानले याप्रसंगी बाळासाहेब ख. बराटे, राष्ट्रवादी पक्षाचे प्रभाग अध्यक्ष प्रतिक नलावडे, शिवसेना युवक आघाडीचे प्रणव थोरात, अविनाश चांगन उपस्थित होते.

Img 20240404 wa0013282295463184266198901191

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये