पुणे शहराच्या जुन्या हद्दीतील १६ नगरसेवक कमी होणार आणि नव्याने समाविष्ट गावात १६ नगरसेवक वाढणार?

पुणे : पुणे शहराच्या जुन्या हद्दीतील १६ नगरसेवक कमी होणार आणि नव्याने समाविष्ट गावात १६ नगरसेवक वाढण्याचा माजी नगरसेवकांचा अंदाज माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी, प्रशांत बधे यांनी व्यक्त करित या नव्या प्रभाग रचनेवर आक्षेप घेतला आहे.
आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीत एकूण १६५ नगरसेवक निवडून येणार आहेत २०१७ च्या निवडणुकीत १६२ नगरसेवक निवडून आले होते व नंतर समाविष्ट ८ गावातून २ नगरसेवक असे एकूण १६४ नगरसेवक होते.त्यावेळी प्रभाग रचना करताना जुन्या महानगरपालिकेच्या लोकसंख्येमध्ये १५ टक्के वाढ धरून ती अंदाजे ३५ लाख धरण्यात आली होती. नवीन रचनेमध्ये कोणत्याही प्रकारची वाढ न धरता प्रभाग रचना करत आहेत.

यामध्ये जुन्या पुणे महानगरपालिकेची एकूण लोकसंख्या ३१ लाख २४ हजार आहे तर समाविष्ट नऊ अधिक २३ अशा एकूण ३२ गावांची लोकसंख्या ३ लाख ५७ हजार आहे यावेळी प्रभाग रचना करताना एकूण १६५ नगरसेवक असल्यामुळे चार चा प्रभाग करताना प्रत्येक प्रभागामध्ये अंदाजे लोकसंख्या ८५००० एवढी असणार आहे यामध्ये पाच ते दहा टक्के कमी जास्त लोकसंख्या असू शकते या सगळ्याचा परिणाम खालील प्रमाणे होणार आहे.
नवीन गावातील लोकसंख्येच्या आधारे त्या ठिकाणी चारचे प्रभाग करावे लागतील म्हणजेच १६ नगरसेवक नवीन ३२ गावातून निवडून येतील.नवीन रचनेप्रमाणे महानगरपालिकेचे प्रत्यक्षात ४१ किंवा ४२ प्रभाग होतील.यातील चार प्रभाग वजा केले तर जुन्या महानगरपालिकेत फक्त ३७ प्रभाग होणार आहेत म्हणजे चार प्रभाग कमी झाल्यामुळे जुन्या महानगरपालिकेमधून जे १६२ नगरसेवक निवडून आले होते त्याच्या ऐवजी आता फक्त १४८ ते १४९ नगरसेवकच निवडून येणार आहेत. असा आमचा अंदाज आहे.



यामुळे आज असलेल्या १६२ नगरसेवकांपैकी १६ जणांना नक्की निवडणूक लढवता येणार नाही असा आमचा अंदाज आहे प्रत्यक्ष प्रभाग रचना होताना कशी करतात व ३२ गावातील लोकसंख्या विचारात घेऊन नव्याने समाविष्ट गावांना न्याय देणार आहेत का जुन्या पुण्यातील सर्व नगरसेवक संख्या तसेच ठेवण्यासाठी ३२ गावातून फक्त चार ते सहा नगरसेवक निवडून देत आहेत हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे असे आमचे मत आहे.
आम्ही मागील निवडणुकीतील केलेले प्रभाग व आत्ताचे प्रभाग याचा अभ्यास व लोकसंख्या याचा विचार करून हा अंदाज वर्तवला आहे बघूया काय होते ते जुन्या पुण्यातील १६ नगरसेवक कमी होतात की नवीन गावातील फक्त चार-चार नगरसेवक निवडून येत आहेत हे लवकरच लक्षात येईल नवीन गावामध्ये ८५ हजार लोकसंख्येप्रमाणे १६ नगरसेवक होत आहेत यामध्ये समाविष्ट भागात नगरसेवक कमी झाल्यास या १६ गावांमध्ये नाराजी निर्माण होऊन अस्वस्थता राहील याची प्रशासनाला दखल घ्यावी लागेल. असे सांगत माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी, प्रशांत बधे यांनी व्यक्त करित या नव्या प्रभाग रचनेवर आक्षेप घेतला आहे.






