पुणे शहर

सत्याचा उच्चार करण्याची आवश्यकता ; साहित्यिक भारत सासणे यांचे वारजे येथे आयोजित वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

पुणे : अघोषित वाचाबंदी आलेली असताना, जगभर आतंक पसरलेला असताना सत्याला सामोरे जाण्याची शक्ती आपणामध्ये येणे आवश्यक आहे. सध्याच वातावरण हे भीतीदायक आहे.  विचारवंतांना जे बोलायचे आहे ते बोलता येत नाही. अघोषित अशी वाचाबंदी असतांना विद्यार्थ्यांनी निर्भयपणे सत्याचा उच्चार करावा. वक्तृत्व ही कला आहे. विचार नेमकेपणाने मांडणे स्पर्धेमध्ये महत्वाचे असल्याचे मत जेष्ठ साहित्यिक भारत सासणे यांनी व्यक्त केले. The need to speak the truth;  Sahityik Bharat Sasane guides the students in the oratory competition organized at Warje

वारजे-माळवाडी येथील संस्कार मंदिर संस्थेचे कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष, नगरसेवक दिलीप बराटे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन सासणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दिलीप बराटे, विशाल थोरात, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप भोईटे, स्पर्धेचे संयोजक डाॅ. राजेंद्र थोरात, प्रा.आशुतोष कसबेकर उपस्थित होते. ३९ विद्यार्थ्यांनी वक्तृत्व स्पर्धेत प्रत्यक्ष सहभाग नोंदवला. या वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षण डाॅ. प्रताप साळुंखे, डाॅ. विजय बालघरे, डाॅ. राहुल जगदाळे यांनी केले.

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना संस्कार मंदिर संस्थेचे अध्यक्ष दिलीप बराटे म्हणाले, ‘संस्कृती हा पाया आहे. संस्कृतीच्या पायावर आपल्याला विकासाच व शिक्षणाच मंदिर उभारायच आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासात वक्तृत्व स्पर्धा महत्वाच्या आहेत.

उद्दघाटन समारंभाचे सूत्रसंचालन प्रा.प्राजंली विद्यासागर यांनी केले तर स्पर्धेचा उद्देश प्रास्ताविकातून सुजित काळंगे यांनी कथन केला.समारंभाचे आभार डाॅ ललिता कानगुडे यांनी मानले.महाविद्यालयाचे प्राध्यापक व निवडक विद्यार्थी उपस्थित होते.

Img 20210131 wa0157

वक्तृत्व स्पर्धेचा निकाल-

प्रथम क्रमांक – कमलेश महाले. नंदुरबार.
द्वितीय क्रमांक – आश्विनी टाव्हरे, पुणे
तृतीय क्रमांक – हर्षवर्धन आलासे, सांगली

उत्तेजनार्थ प्रथम – रविंद्र शिंदे पुणे
उत्तेजनार्थ द्वितीय – दत्तात्रय चोरमले, सातारा
उत्तेजनार्थ तृतीय – प्रसाद जगताप,धुळे
उत्तेजनार्थ चतुर्थ – प्रांजल कुलकर्णी, श्रीगोंदा
सर्वोत्कृष्ट वक्ता पुरस्कार – रोहन कवडे पुणे

Img 20210131 wa0061

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये