पुणे पालिकेच्या मलनिसारण विभागातील आर्थिक घोटाळ्यातील रक्कम संबंधित ठेकेदाराकडून वसूल करावी – पृथ्वीराज सुतार

पुणे :पुणे महापालिकेच्या मलनिसारण विभागातील आर्थिक घोटाळ्यातील रक्कम ठेकेदारा कडून वसूल करावी. तसेच त्रयस्थ संस्थेच्या माध्यमातून या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी. अशी मागणी शिवसेनेचे पालिकेतील गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी केली आहे.(The amount of financial scam in the sewerage department of Pune Municipal Corporation should be recovered from the concerned contractor – Prithviraj sutar)
सुतार म्हणाले, पुणे महापालिकेच्या मलनिसारण विभागातर्फे पाटील कन्स्ट्रक्शन कंपनी यांना पुणे शहरामध्ये विविध ठिकाणी मोठ्या व्यासाच्या ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम देण्यात आले होते. मलनिस्सारण खात्यात्यामार्फत वेळोवेळी झालेली कामाची बिल ठेकेदार यांना अदा करण्यात येतात.याच पद्धतीने सदर ठेकेदाराने सुमारे पावणे पाच कोटीचे बिल खात्यास सादर केले असता,ते खात्याने कनिष्ट अभियंता ते कार्यकारी अभियंता यांच्या सहीने अधिक्षक अभियंता यांच्या केलेली सही पाहता सदरील अधिक्षक अभियंता हे यापूर्वी सहा महिने अगोदरच निवृत झाले होते.

सदर अधिक्षक अभियंता यांनी ती सही स्वताची नमल्याचे
जाहीरपणे सांगितले आहे. अशा प्रकारे ठेकेदाराने संगनमताने खोटे बील घेतलेले आहे.तरी हे बील रद्द करून सदरील ठेकेदाराकडून ही रकम वसूल करून या ठेकेदाराने पूर्वी केलेल्या कामांच्या बीलाची व कामांची संपूर्णपणे त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी करून त्याचा अहवाल मुख्य सभेला सादर करावा व खोट्या सहीसाठी मनपाचे आर्थिक नुकसान केल्यावदल फौजदारी गुन्हा दाखल करून त्याचा अहवालमुद्धा मुख्य सभेला सादर करावा व तोपर्यंत सदर ठेकेदाराची पुणे मनपातील सर्व कामे थांबविण्यात यावीत. अशी मागणी सुतार यांनी केली आहे.






