पुणे शहर

आरोग्य तपासणी शिबीराचे ३५० जणांचा सहभाग ; आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केले आयोजन.

पुणे : शिवाजीनगर मतदारसंघ, बोपोडी येथील संजय गांधी हॉस्पिटलमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर आज (गुरुवारी) आयोजित करण्यात आले होते. त्यात ३५० जणांनी सहभाग घेतला, अशी माहिती आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी दिली.

या शिबीरासाठी भारती हॉस्पिटल आणि एच.व्ही.देसाई हॉस्पिटल यांचे सहकार्य लाभले. शिबीरात कर्करोग (सर्जरी मोफत), हृदय रोग (एंजिओप्लास्टी, बायपास मोफत), हार्निया, जनरल तपासणी, मोफत डायलिसिस, साधारण प्रसुती – सिझेरीन प्रसुती (अल्प दरात), आहार तज्ज्ञांचा मोफत सल्ला, मानसोपचार मोफत सल्ला, नेत्र तपासणी, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, सवलतीच्या दरात चष्मे वाटप, मुतखडा, मूळव्याध, ॲपेंडिक्स, त्वचारोग याच्या तपासण्या करण्यात आल्या, मोफत औषधे देण्यात आली.

Fb img 1648963058213

शिबीरात जे, जे नागरिक सहभागी झाले त्यांच्यावर मोफत उपचार होईपर्यंत पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही आमदार शिरोळे यांनी शिबीराच्या उदघाटनप्रसंगी बोलताना दिली. यापुढेही शासकीय योजना राबविल्या जातील आणि आरोग्य शिबीरे आयोजित केली जातील, असे आमदार शिरोळे यांनी सांगितले.

याप्रसंगी सर्वश्री दत्ताभाऊ खाडे, प्रकाश ढोरे, रविंद्र साळेगावकर, दत्तात्रेय गायकवाड, आनंद छाजेड, सुनील माने, गणेश बगाडे, मुकेश गवळी, शैलेश बडदे, प्रकाश सोलंकी, दलजितसिंग रँक, धर्मेश शहा, बाळासाहेब दारवटकर, रोहित भिसे, संकेत कांबळे, सागर मदने, सुप्रिम चोंधे, नीलेश रेणुसे, जय जोशी तसेच शिवाजीनगर मतदारसंघातील भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये