कोथरूड मधील व्यापारी, दुकानदार, लघु व्यावसायिकांचे प्रश्न चंद्रकांत मोकाटेच सोडवू शकतात… व्यापाऱ्यांनी बैठकीत व्यक्त केल्या भावना..

कोथरूड : व्यापारी, दुकानदार, लघु व्यावसायिकांपासून ते मोठया दुकानदारांच्या समस्या सोडवण्यासाठी कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आणि माजी आमदार चंद्रकांत मोकाटे हेच प्रयत्न करू शकतात असा विश्वास कोथरूड व्यापारी संघांचे उपाध्यक्ष राजेंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.
कोथरूड व्यापारी संघांच्या व्यापारी सदस्यांची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत मोकाटे, जयेश खक्कर, शांताराम अमराळे दिलीप चोरगे, सुनिल लोटलीकर, कैलास परमार, बगाराम चौधरी दादासाहेब भेलके, सचिन पाटील व व्यापारी वर्ग उपस्थित होता.
चव्हाण म्हणाले की, कोथरूड विधानसभा मतदारसंघात 5,800 व्यापारी आहेत. या व्यापाऱ्यांच्या अनेक समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी चंद्रकांत मोकाटे आम्हाला अनेक वेळा मदत करतात. आमच्या व्यापारी व दुकानदारांच्या समस्या सोडविण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधीच हवा. ते कोणत्याही वेळेला आमच्यासाठी उभे राहतात
यावेळी बोलताना मोकाटे म्हणाले की, दुकानदारांच्या, व्यावसायिकांच्या समस्या सोडवण्याण्यासाठी मी कायम प्रयत्न करीत आलो आहे. आणि यापुढेही त्यांच्या पाठीशी मी कायम असणार आहे.



