काम बोलतंय, विश्वास वाढतोय..काय म्हणतायत भीमराव तापकीर

मतदारांनी दाखवलेला विश्वास विकास कामाच्या माध्यमातून जपणे हे माझे कर्तव्य : भीमराव तापकीर
पुणे : आमचं काम बोलतंय” आम्ही मतदारांना गृहीत धरत नाही, आम्ही त्यांच्या विश्वासाला प्रामाणिकतेने उतराई होतो,” मतदारांनी दिलेल प्रत्येक मत हे त्यांनी माझ्यावर ठेवलेला विश्वास आहे. विकास कामाच्या माध्यमातून तो विश्वास प्रामाणिकपणे जपणे हे माझे कर्तव्य आहे अशा भावना खडकवासला विधानसभा मतदार संघाचे भाजप महायुतीचे उमेदवार भिमराव तापकीर यांनी व्यक्त केल्या आहेत.
खडकवासला मतदार संघात भिमराव तापकीर प्रचारात नागरिकांमध्ये प्रत्यक्ष जाऊन भेटी गाठी मतदारांशी संवाद साधत आले आहेत. आजच्या प्रचार दौऱ्यात त्यांनी वारजे येथील उद्यानात तसेच वॉकिंग ट्रॅकला आलेल्या नागरिकांच्या गाठी भेटी घेत त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी माजी नगरसेवक किरण बारटक्के, भाजपा पुणे शहर सहकार आघाडी अध्यक्ष सचिन दांगट, माधव देशपांडे, पराग ढेणे उपस्थित होते.
ना दिखावा, ना दबाव – लोकांसाठी निःस्वार्थ नेतृत्व असलेले खडकवासला विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या मनामध्ये प्रामाणिकता, मितभाषी स्वभाव, आणि कामांमधून परिणाम साधत भिमराव तापकीर यांनी आपली ओळख निर्माण केली आहे अशा प्रतिक्रिया वारजेतील पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या.

तापकीर म्हणाले “गोंधळ न करता, गाजावाजा न करता, काम करत राहणे” हा माझा स्वभाव आहे. निस्वार्थीपणे जनतेसाठी कार्यरत असून प्रलोभनांना फाटा देत कामांवर भर दिला आहे. मतदारांना खोटी आश्वासने किंवा प्रलोभने देणे जमत नाही. कामाची प्रामाणिकता आणि लोकांचा विश्वास हाच विजयाचा खरा मार्ग आहे. लोकांसाठी सतत उपलब्ध, कोणतीही अडचण असो, नेहमी मतदारांच्या सोबत उभे राहणे यामुळे मतदारांशी नाते निर्माण झाले आहे. त्यामुळे मतदार संघातील व्यक्तीला माझ्याशी संवाद साधणे सोपे वाटते. कामगिरीचा पाया, विश्वासाचा आधार असल्याने गेल्या अनेक वर्षांतील कार्याने खडकवासल्यात विकासाचा रथ पुढे जात आहे.
रस्ते, पाणीपुरवठा, समाविष्ट गावांमधील विकासकामे, वीजपुरवठा, पर्यटन विकास, ब्रिज, समाजमंदिर, ओपन जिम, सोसायट्यांना वीज बिल बचतीसाठी सोलर प्रकल्प, आणि इतर मूलभूत विकासात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या गरजा ओळखून त्या पूर्ण करण्यासाठी सातत्याने कार्यरत राहणारा नेता अशी त्यांची प्रतिमा तयार झाली आहे. त्यामुळेच नागरिकांना भीमराव अण्णाच पुन्हा आमदार व्हावेसे वाटतात अशा भावना स्थानिकांकडून व्यक्त केल्या जातं आहेत.





