वारजेतील महिलांनी इंग्लिश बोलणे शिकण्याची इच्छा केली पूर्ण ; भावना व्यक्त करताना दिपाली धुमाळ यांचे मानले आभार

वारजे : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून वारजे माळवाडी मधील महिलांसाठी माजी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ व शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ यांच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या इंग्लिश स्पीकिंग कोर्सच्या पहिल्या वर्गाचा समारोप समारंभ उत्साहात पार पडला. सहभागी महिलांनी इंग्लिश मध्ये आपले मनोगत व्यक्त करत धुमाळ दाम्पत्यांचे आभार मानले.
या एक महिन्याच्या कोर्स साठी पन्नास महिलांनी सहभाग घेतला होता. एक महिन्याचा कोर्स पूर्ण करून पहिल्या वर्गाचा समारोप समारंभ पार पडला. यावेळी अनेक महिलांनी या कोर्स मध्ये आलेले अनुभव, दिपाली धुमाळ व बाबा धुमाळ यांनी इंग्लिश शिकण्याची उपलब्ध करून दिलेली संधी, प्रा. जंगम सर यांनी उत्तम दिलेले प्रशिक्षण याबाबत आपल्या भावना इंग्रजी मध्ये बोलून आपल्या मनोगत व्यक्त केले.
या समारोप कार्यक्रम प्रसंगी दिपाली धुमाळ, प्रदीप ऊर्फ बाबा धुमाळ, मानसी नलावडे, सुरेश जाधव, येवले सर स्पोकन इंग्लिश कोर्सचे शिक्षक प्रा.जंगम सर उपस्थित होते.

यावेळी बोलताना दिपाली धुमाळ म्हणाल्या इंग्लिश मध्ये बोलून या महिलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या त्यामुळे या उपक्रमाचे आयोजन केल्याचे समाधान वाटत आहे. या कोर्सला मिळालेला प्रतिसाद पाहता महिलांमध्ये इंग्रजी शिकण्याची आवड दिसून येते. केवळ वेळ आणि योग्य संधी न मिळाल्याने त्यांना हा कोर्स करणे शक्य झाले नव्हते. महिलांनी वेळेचा आणि संधीचा योग्य उपयोग करत इंग्लिश भाषा शिकण्याची आपली इच्छा पूर्ण केली आहे. या कोर्सला मिळालेला प्रतिसाद पाहता दुसरी बॅच ही लवकर सुरू करण्यात येईल असे धुमाळ यांनी सांगितले.



