आरोग्य

पुण्यात थंडीमुळे सर्दी, खोकला, तापाचे रूग्ण वाढले : डाॅ.जयंत खोरे इनामदार

अशी घ्या काळजी ..

गेले पंधरा दिवस झाले वातावरणात वाढलेल्या थंडीमुळे व शितलहरीमुळे सर्दी, कोरडा खोकला,ताप, थोडी अंगदुखी चे रूग्ण वाढलेले दिसत आहेत. शहरातील बहुतांशी लोकांना वरील लक्षणे जाणवत आहेत. जवळचा कोणतरी किंवा त्याच्या संपर्कातील कोणी आजारी पडले असल्याचे बोलण्यातून समोर येत आहे.

कोरोना संसंर्गाचा धोका आहेच पण, एरवी जानेवारीमध्ये होणारी सर्दी, कोरडा खोकला, ताप आला तर फारसे कोणी दखल घेत नव्हते. कोरोना पुर्व काळात ह्या समस्यांवर बहुतेक रुग्ण स्वतःहा घरगुती औषधोपचार करत होते परंतु आता कोरोना संसंर्ग, भिती, वाढलेले रुग्ण बघता वरील लक्षणे जाणवल्यास रुग्ण दवाखान्यात लवकरात लवकर जावून औषधोपचार करून घेण्यावर भर देत आहेत.

हवामान खात्याच्या अनुमानानुसार अजून काही दिवस   हवेतील गारवा थंडावा राहणार आहे. त्यामुळे सकाळी व संध्याकाळी थंडावा जास्त प्रमाणात जाणवणार आहे. त्यामुळे उबदार कपडे घालणे आवश्यक आहे. वयस्कर लोक वैद्यकीय दुष्ट्या आजारपण असलेल्या रुग्णांची, लहानमुले यांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

थंड पदार्थ थंड पेय टाळले पाहीजे तर गरम ताजे सकस आहार घेतला पाहीजे. सर्दी, कोरडा खोकला, ताप, अंगदुखी कोणतेही लक्षणे दिसू लागताच घरगुती उपाय करत बसू नये आपल्या फॅमिली डॉक्टरचा सल्ला घेऊन शंकानिरसन करून औषधोपचार करावेत.

आजारपण अंगावर काढणे अथवा लगेच औषधोपचार न घेणे ह्या मुळे आपण आपले आरोग्य व परिवारातील इतर सदस्यांचे आरोग्य धोक्यात घालू शकतो. आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेलही परंतू आपल्या परिवारातील सदस्यांची रोगप्रतिकारक शक्ती कदाचित कमजोर असू शकते त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे.
कोरोना संसंर्ग टाळण्यासाठी नियमांचे पालन करणे  व आजारी पडल्यास लवकर उपचार सुरू करणे हाच रामबाण उपाय आहे..

डाॅ.जयंत खोरे इनामदार
युनिक व ॲपल हाॅस्पीटल भूगाव

Img 20220118 wa00126707376222918832787

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये