पुणे शहर

महागाईच्या काळात सर्वसामान्यांची दिवाळी सुकर करण्यासाठी शंकर केमसे यांच्यावतीने दिवाळी सरंजाम किटचे वाटप

कोथरूड : दिवाळी निमित्त भुसारी कॉलनी, बावधन प्रभागातील नागरिकांसाठी दरवर्षी प्रमाणे मोफत दिवाळी सरंजाम वाटपाचा उपक्रम माजी सभागृह नेते शंकर केमसे यांच्या वतीने राबवण्यात येत असून आतापर्यंत ५ हजाराहून अधिक नागरिकांना सरंजाम किटचे वाटप करण्यात आले आहे.

सरंजाम किट वाटपाचा कार्यक्रम माजी सभागृह नेते शंकर केमसे यांच्या उजव्या भुसारी कॉलनीतील बांदल धनकुडे प्लाझा येथील जनसंपर्क कार्यालय येथे सुरू असून नागरिकांना सरंजाम किट मिळवताना त्रास होणार नाही अशा पद्धतीने वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे. गर्दी होणार नाही, नागरिकांना रांगेत उभे रहावे लागणार नाही याची कार्यकर्त्यांकडून खबरदारी घेण्यात येत आहे.

वाढलेल्या महागाईमुळे सर्व सामान्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. दुकानातील प्रत्येक आवश्यक वस्तूंचे दर भरमसाठ वाढलेले आहेत. दिवाळीच्या तोंडावर महागाई कमी होईल अशी नागरिकांची अपेक्षा होती, पण नागरिकांचा अपेक्षा भंग झाला आहे. या महागाईच्या काळात प्रभागातील नागरिकांची दिवाळी सुकर व्हावी यासाठी या दिवाळी सरंजाम वाटप उपक्रमाचे आयोजन केल्याचे माजी सभागृह नेते शंकर केमसे यांनी सांगितले.

Fb img 1647413711531

अभिनेते किरण गायकवाड यांची उपक्रमाला भेट
नागरिकांसाठी सुरू असलेल्या या दिवाळी सरंजाम वाटप उपक्रमाला देवमाणूस मालिकेत प्रमुख भूमिका साकारलेले अभिनेते किरण गायकवाड यांनी भेट देत या उपक्रमाचे कौतुक केले. सर्व सामान्य नागरिकांची दिवाळी गोड व्हावी या उद्दात हेतूने शंकर केमसे यांच्या वतीने राबवला जात असलेला उपक्रम कौतुकास्पद असून नागरिकांना दिलासा देणारा असल्याचे मत किरण गायकवाड यांनी व्यक्त केले.

Img 20221012 192956 045
Screenshot 2022 10 19 10 52 53 83
Img 20221020 wa0232

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये