पुणे शहर

पुण्यातील हि दुकाने राहणार बंद महापौरांची माहिती…

पुणे : महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यभरात लॉकडाऊनची घोषणा केली. 1 जूनपर्यंत असणारा लॉकडाऊन आता 15 दिवसांसाठी आणखी वाढवण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. यामध्ये पुण्यात स्थानिक पातळीवर स्पा, सलून आणि जिम सुरू करण्यात आले होते मात्र राज्य सरकारच्या आदेशानुसार ते आता बंद करण्यात येणार आहे. अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.(These shops in Pune will remain closed)

महाराष्ट्रासह पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस आटोक्यात येत असल्याचे दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुणे महापालिका स्थानिक पातळीवर पुणे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार स्पा, सलून आणि जिम सुरु करण्यात आल्या होत्या.मात्र राज्य सरकारने केलेल्या नियमावलीमुळे निर्णयात बदल करण्यात आला आहे.

Img 20210522 wa0204

पुण्यातील उद्याने, मैदान, मंगल कार्यालय, पीएमपीएमएल बससेवा, सलून, जिम बंद राहणार आहे. शनिवार आणि रविवार सकाळी 7 ते 2 यावेळेत फक्त अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरु राहणार, अन्य दुकाने बंद ठेवली जाणार आहेत. दुपारी तीन वाजल्यानंतर नागरिकांना अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये