मराठा समाजाच्या राज्यव्यापी बैठकीत हे ठराव झाले पास….

मुंबई : maratha aarakshan मराठा आरक्षणा संदर्भात आज मराठा समाजाची राज्यव्यापी बैठक मुंबईत पार पडली. यावेळी आरक्षणा बाबतीत विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली. तसेच काही ठराव या बठकीत पास करण्यात आले. आमदार विनायक मेटे , मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक, मराठा समाजातील विविध संघटनांचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली.
या बैठकीत १. अशोक चव्हाण यांना मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्ष पदावरून हटवण्यात यावं. आणि त्याजागी अजित पवार, एकनाथ शिंदे किंवा जयंत पाटील यांच्यातील एकाची निवड करण्यात यावी २) सर्वोच्च न्यायालयाने नवीन कायदेतज्ज्ञ यांचा समावेश करून पुढील रणनीती ठरवावी ३) मराठा आरक्षण टिकवण्यासाठी सरकार काय करणार याबाबत 31 डिसेंबर पर्यत सरकारने चर्चा करावी आणि जो निर्णय घेतला त्याबाबत पुन्हा मराठा समाजातील नेत्यांची बैठक घेऊन माहिती द्यावी
४) जोपर्यंत आरक्षणाचा निर्णय लागत नाही तोपर्यंत भरती प्रक्रिया राबवू नये ५) मराठा आरक्षणला स्थगिती मिळण्यापूर्वी ज्या मुलांच्या नियुक्त्या झाल्या आहेत. त्यांना त्वरित नियुक्त्या देण्यात याव्यात. ६) मराठा समाजाला एसइबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळण्याचा कोर्टातील निर्णय येई पर्यत इडब्ल्यूएस कोट्यातून आरक्षण देण्यात यावे. आणि मुलांना दिलासा द्यावा ७) जर 31 डिसेंबर पर्यत सरकारने काहीच हालचाल केली नाही तर 3 जानेवारीला बैठक घेऊन आगामी काळातील आंदोलन, रस्ता रोको, धरणे आंदोलन याबाबत निर्णय घेण्यात यावा
८) जे आज आयोजित करण्यात आलेल्या बैठीकाला नव्हते विनंती आहे की, 3 जानेवारीच्या बैठकीला उपस्थित राहावं.९) कोपर्डी आणि तांबडीच्या गुन्हेगारांना तत्काळ फाशी देण्यात यावी १०) सारथी, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ याबाबत सरकारने त्वरित निर्णय घेऊन मार्ग काढावा.
असे ठराव करण्यात आल्याची माहिती शिवसंग्राम संघटनेचे पुणे शहराध्यक्ष भरत लगड यांनी दिली.







