पुणे शहर

वारजे टेकडीवर वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न..निसर्ग मित्रचा सातत्यपूर्ण उपक्रम

पुणे : निसर्ग मित्र फाउंडेशनच्या वतीने वारजे टेकडीवर वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला निसर्गप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत वृक्षारोपण केले.

या कार्यक्रमासाठी, ४० वर्षांची पूर्तता झाल्यानिमित्त भ्रातृमंडळ पुणे यांनी ४५ रोपे उपलब्ध करून दिली. तसेच, पुणे महानगरपालिकेच्या सहकार्याने माजी नगरसेवक व माजी शिक्षण मंडळ अध्यक्ष  बाबा धुमाळ यांनी १५० रोपे दिली होती.  महाराष्ट्र वन विभागानेही या कार्यक्रमासाठी मोलाचे सहकार्य केले.

Img 20250508 wa0001235733770892078245

याप्रसंगी भ्रातृमंडळ पुणेचे अध्यक्ष अनिल बोंडे,  सौ. खर्चे , माजी नगरसेवक बाबा धुमाळ, राहुल बडगुजर, चंद्रकांत एम चौधरी ,पायगुडे, शिंदे, शेट्टी, तरडे आणि इतर निसर्गप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वृक्ष संवर्धनासाठी फाउंडेशनच्या वतीने सातत्याने विविध उपक्रम राबवले जात असल्याची माहिती वारजे निसर्ग मित्र फाउंडेशनचे संचालक चंद्रकांत एम. चौधरी यांनी दिली.

Img 20240404 wa0013282293280934616164697357

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये