पुणे शहर

कोथरूडमध्ये उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस पेढे वाटून उत्साहात साजरा..

पुणे, कोथरूड : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस कोथरूडमध्ये ठाकरे शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेना, कर्वे पुतळा चौक शाखेच्या वतीने नागरिकांना पेढे वाटून उत्साहात साजरा करण्यात आला.

कर्वे पुतळा चौक वाहतूक सेना शाखा अध्यक्ष मारुती वर्वे यांच्या वतीने हा कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी चौकातून जाणाऱ्या नागरिकांना पेढ्यांचे वाटप करण्यात आले तसेच उद्धव ठाकरे यांच्या निरोगी, दीर्घ आणि उदंड आयुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली.

यावेळी शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि जनतेच्या हितासाठी सुरू असलेल्या कार्याचा गौरव केला. वाढदिवसानिमित्त सामाजिक सलोखा, जनसंपर्क आणि नागरिकांशी संवाद वाढावा या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. या प्रसंगी पक्षाचे पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.

Img 20260222 wa00063491038201882637992

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये