महाराष्ट्र

नक्कल केल्यानंतर भास्कर जाधवांची बिनशर्त माफी

मुंबई : नक्कल केल्यानंतर भास्कर जाधवांची बिनशर्त माफी सभागृह सुरू होताच भास्कर जाधवांनी बिनशर्त माफी मागितली. मात्र, त्यावेळी देवेंद्र फडणवीसांना देखील त्यांनी टोला लगवला. मी माफी मागावी असा आग्रह विरोधी सदस्यांकडून होतो आहे. अशा प्रकारचे प्रसंग या सभागृहात अनेकवेळा आले. एखाद्या गोष्टीसाठी माफी मागितल्याने माणूस लहान होतो असं नाही”, असं भास्कर जाधव म्हणाले.

“मी कोणताही असंसदीय शब्द वापरलेला नाही. मी अंगविक्षेप मागे घेतो, शब्द मागे घेतो म्हटलं तर देवेंद्र फडणवीसांना मान्य नाही. पण या सभागृहाचं कामकाज सुरळीतपणे चालायचं असेल आणि मी पंतप्रधानांबद्दल बोलल्यामुळे सभागृहाच्या भावना दुखावल्या असतील, तर नुसती दिलगिरीच नाही, तर मी सभागृहाची बिनशर्त माफी मागतो. जे पंतप्रधान पूर्वी बोलले होते, तोच मी उल्लेख केला, तरी देखील मी माफी मागतो”, असं भास्कर जाधव म्हणाले. मी हक्कभंगासाठी तयार
“कोणताही असंसदीय शब्द न वापरता आपण मला माफी मागायला सांगितली. पण विरोधी पक्षनेत्यांनी संगितलं की आम्ही हक्कभंग आणणार आहोत. त्यांनी जरूर आणावा, मी त्यासाठी तयार आहे”, असं आव्हान देखील त्यांनी देवेंद्र फडणवीसांना दिले.

Img 20211129 wa0128

हिवाळी अधिवेशन : भास्कर जाधवांनी केली. मोदींची नक्कल https://www.sinhasannews.com/winter-convention-conducted-by-bhaskar-jadhav-modis-imitation-7569/

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये