पुणे शहर

पुण्यातील पालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन मदतीला !

पुणे: पुणे महापालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाला केंद्राच्या एनएमसी अर्थात नॅशनल मेडिकल कमिशनची लवरकच मान्यता मिळण्यासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांची विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी भेट घेतली. या दरम्यान वैद्यकीय महाविद्यालयाला मान्यता मिळवण्यासाठी मदत करण्यासंदर्भात डॉ. हर्षवर्धन यांनी आश्वस्त केले. ही मान्यता मिळाल्यानंतर यंदाच्या शैक्षणिक वर्षातच प्रवेश द्यायला सुरुवात होणार आहे.(Union Health Minister Dr. for the Municipal Medical College in Pune. Harshvardhan to help!)

मोहोळ स्थायी समितीचा अध्यक्ष असताना वैद्यकीय महाविद्यालयाची संकल्पना मांडून त्यास निधी उपलब्ध करुन दिला होता. शिवाय याबाबत सातत्याने पाठपुरावा केल्याने वैद्यकीय महाविद्यालय साकारण्याचा प्रवास राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या अंतिम मंजुरीपर्यंत पोहोचला आहे. याच अंतिम मंजुरीसाठी आज दिल्लीत विरोधपक्ष नेते देवेंद्र यांच्या पुढाकाराने केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची भेट घेऊन वैद्यकीय महाविद्यालयासंदर्भात चर्चा करून मान्यतेसंदर्भात मदत करण्याची विनंती केली. अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

Img 20210116 wa0007

यावेळी स्थायीचे अध्यक्ष श्री. हेमंत रासने, सभागृह नेते श्री. गणेश बीडकर आणि महापालिका आयुक्त विक्रम कुमार हेही उपस्थित होते.

मोहोळ म्हणाले,विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी हे महाविद्यालय पुणे शहराच्या दृष्टीने किती महत्त्वाचे आहे? याबाबत आरोग्यमंत्र्यांना माहिती दिली. तर मी या महाविद्यालयाचा आजवरचा प्रवास सांगितला. आरोग्यमंत्र्यांच्या भेटीनंतर राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाचे अध्यक्ष डॉ. सुरेश चंद्र शर्मा यांचीही भेट घेतली.

वैद्यकीय महाविद्यालय प्रत्यक्ष सुरू करण्यासाठीचा शेवटचा टप्पा पार पडत असून विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्याशी थेट आणि सविस्तरपणे चर्चा करता आली. आपल्या पुणे शहराच्या आरोग्य सेवेच्या सक्षमीकरणासाठी हे वैद्यकीय महाविद्यालय मैलाचा दगड ठरणारे आहे. वैद्यकीय महाविद्यालयासाठीच्या इतर सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्या असून केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांच्याकडून पूर्णपणे सहकार्य करण्याचे आश्वासन मिळाले आहे, ही पुणेकरांसाठी समाधानाची बाब आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये