महाराष्ट्र

भाजपचा अधिकृत वेबसाईटवर खासदार रक्षा खडसे यांच्या नावापुढे आक्षेपार्ह उल्लेख.. गृहमंत्री अनिल देशमुख यांचा कारवाईचा इशारा

भाजपचा अधिकृत वेबसाईटवर भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांच्या नावापुढे आक्षेपार्ह उल्लेख करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. यासंदर्भात भाजपने तातडीने कारवाई करावी अन्यथा महाराष्ट्र सायबर सेल कारवाई करेल असे गृह राज्यमंत्री अनिल देशमुख यांनी म्हंटले आहे. Offensive mention next to MP Raksha Khadse’s name on BJP’s official website.

भाजपच्या वेबसाईटवर रक्षा खडसे यांच्या नावापुढे अपमानकारक उल्लेख करण्यात आला असून त्याचा स्क्रीन शॉट व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत अनिल देशमुख यांनी म्हंटले आहे की भाजपाच्या अधिकृत वेबसाईटवर महाराष्ट्रातील भाजपा खासदार रक्षा खडसे यांचे असे अपमानजनक वर्णन पाहून मला धक्का बसला आहे. अशा प्रकारे महिलांचा अवमान करणाऱ्यांची महाराष्ट्र सरकार गय करणार नाही. आपण दोषींवर तत्काळ कारवाई करावी अन्यथा महाराष्ट्र साहेब असेल पुढील कारवाई करेल असा इशारा देशमुख यांनी ट्विटर वर पोस्ट करत दिला आहे.

भाजपच्या वेबसाईटवर पक्षाच्या देशातील सर्व खासदारांची माहिती देण्यात आली आहे. यात खासदारांचे नाव फोटो आणि मतदार संघाचा उल्लेख आहे. मात्र रक्षा खडसे यांच्या  नावापुढे मतदार संघ ऐवजी चुकीचा व संतापजनक उल्लेख करण्यात आल्याचे दिसत आहे. ही चूक आता तरी दुरुस्त करण्यात आली असली तरी स्क्रीन शॉट व्हायरल झाल्याने गोंधळ उडाला आहे. या संदर्भात भाजपकडून अद्याप स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

Img 20210116 wa0007

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये