सिनेजगत

“मेरी डीपी इतनी धांसू, चित्रा मेरी सासू”, उर्फी जावेदचे ट्वीट

मुंबई : तोकड्या कपड्यांवरून कारवाई करण्याची मागणी करणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांना अभिनेत्री उर्फी जावेदने ट्वीट करत पुन्हा एकदा डिवचलं आहे. “उर्फी जावेद समोर आली, तर तिचं थोबाड फोडणार आहे. पण, थोबाड फोडण्याआधी तिला साडी चोळीही देऊ. त्यानंतरही तिनं नंगानाच सुरु ठेवला, तर तिचं थोबाड फोडणार,” असं चित्रा वाघ यांनी म्हटलं होतं.

उर्फीने एक फोटो ट्वीट केला आहे. त्यावर तिने चित्रा वाघ यांना टॅग करत लिहलं की, “लेकिन अभी बोहोत सुधार बाकी है. सॉरी चित्रा वाघ जी. आय लव्ह यू.” तर दुसऱ्या एका ट्वीटमध्ये, “मेरी डीपी इतनी धांसू, चित्रा मेरी सासू,” असं उर्फीने म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये