पुणे शहर

पुण्याचे तापमान 7.4 अंश सेल्सिअस;  यंदाच्या मोसमातील सर्वात कमी तापमान

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांसह जिल्ह्यात रविवारपासून थंडीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. पुण्यातील तापमान 7.4 अंश सेल्सिअस एवढे खाली घसरले आहे.

शहर व जिल्ह्यात काही तासांत पाच अंश सेल्सिअसने किमान तापमानात घट झाल्यामुळे थंडीत अचानक वाढ झाली आहे. ही कडाक्याची थंडी असून, सर्वच भागात अखेर शेकोट्या पेटल्या तसेच नागरिकही उबदार कपडे घालून घराबाहेर पडले असल्याचे दिसून आले.

20230110 093139548634714281517571

पुणे, पिंपरी-चिंचवड तसेच जिल्ह्याच्या सर्वच भागात मागील आठवड्यापासून ते अगदी शनिवार रविवारपर्यंत किमान तापमान 15 ते 16 अंश सेल्सिअसच्या आसपास होते. तर कमाल तापमान 30 ते 33 अंशांवर पोहचले होते. अगदी रविवारी देखील शहराचे किमान तापमान 13. 4 अंश सेल्सिअस नोंदविले गेले होते. मात्र, रविवारी रात्री अचानक त्यामध्ये घट होऊन ते 8.6 अंश सेल्सिअस एवढे खाली घसरले. तर सोमवारी रात्री यामध्ये आणखी घट होऊन 7.4 अंश सेल्सिअस पर्यंत खाली घसरले आहे.

Img 20230110 wa00053052482550557119128

अवघ्या काही तासातच किमान तापमानात 5 हून अधिक अंश सेल्सिअसने घट झाली, त्यामुळे शहरात रविवारी मध्यरात्रीपासून जोरदार थंडी वाढली. सोमवारी दिवसभर शहरात चांगले ऊन पडलेले असूनदेखील चांगलाच गारवा जाणवत होता.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हिमालयीन भागात पश्चिमी चक्रवाताचा प्रभाव वाढलेला आहे.

Img 20230109 wa00053626285548501344433

त्यामुळे उत्तर भारतात शीतलहर आली आहे. या भागाकडून राज्याकडे थंड वारे वाहत आहेत. त्यामुळे शहर व परिसरात थंडी वाढली. शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यात आठवडाभर थंडीचा कडाका जाणवणार आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना उबदार कपडे घालूनच बाहेर पडावे, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

Img 20221228 wa0001281294303512961784024189

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये