‘अदानी’ पाठोपाठ टोरेंट पॉवरचा वीज वितरणासाठी समांतर परवाना अर्ज; नोटीस जारी

पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेसह जिल्ह्यातील सहा लाखांहून अधिक ग्राहकांना वीज वितरणासाठी समांतर परवाना अर्ज
मुंबई : टोरेंट पॉवरने अदानी इलेक्ट्रिसिटीच्या पाठोपाठ महावितरणच्या कार्यक्षेत्रात समांतर वीजवितरण परवान्यासाठी अर्ज केला आहे. कंपनीने पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेसह पुणे जिल्ह्यातील सहा लाखांहून अधिक ग्राहकांना वीज वितरणासाठी समांतर परवाना अर्ज केला आहे. त्यासंबंधी नोटीस जारी केली. या क्षेत्रासाठी 30 दिवसात हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत.
अदानी इलेक्ट्रिसिटीने परवान्यासाठी अर्ज केल्याने मागील आठवड्यात उर्जा क्षेत्र ढवळून निघाले होते. त्यानंतर आता टोरेंट पॉवरनेदेखील परवान्यासाठी अर्ज केल्याचे जाहीर नोटीशीमुळे समोर आले आहे. हा परवाना अर्ज महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने स्वीकारल्यानंतर कंपनीने हरकती व सूचना मागविणारी नोटीस जारी केली आहे.




