लसीकरण मोहिमेस प्रारंभ,
आज पुण्यात ८०० योद्धयांना देण्यात आली कोरोना लस.

महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते फिथ कापून लसीकरण केंद्र सुरु
पुणे : देशभरासह आज पुणे महानगरपालिका हद्दीतही कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. कमला नेहरू रुग्णालयात महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते फिथ कापून लसीकरण केंद्र सुरु करण्यात आलं. यावेळी कोरोना काळात अजोड कार्य करणाऱ्या घटकांना लस देण्यास सुरवात करण्यात आली. पुणे महापालिकेच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यासाठी ८ लसीकरण केंद्राचं नियोजन करण्यात आलं असून आज पहिल्या दिवशी ८०० योद्धयांना लस देण्यात आली. Vaccination campaigns begin, Corona vaccine was given to 800 warriors in Pune today.
यावेळी विभागीय आयुक्त सौरव राव, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, उपमहापौर सरस्वती शेंडगे, सभागृह नेते गणेश बीडकर, स्थायीचे अध्यक्ष हेमंत रासने, अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल, आरोग्य विभागप्रमुख डॉ. आशिष भारती यांच्यासह नगरसेवक, आरोग्य अधिकारी आणि महापालिका कर्मचारी उपस्थित होते.
एकेकाळी पुणे हे देशातील सर्वाधिक एक्टिव्ह रुग्णसंख्या असलेलं शहर होतं. मात्र सर्वांनीच घेतलेल्या मेहनतीमुळे आज अत्यंत सकारात्मक चित्र आहे. लसीकरणाचे आजपासून सुरु झालेलं ‘संजीवनी’ पर्व नक्कीच नवी उमेद दाखवणारे आहे असे मत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले आहे.







